सुरक्षा दलाला मोठे यश : ५ दहशतवाद्यांचा केला खात्मा

बातमी शेअर करा...

बातमीदार| १७ नोव्हेबर २०२३

देशात दिवाळीचा उत्साह सुरु असतांना दोन दिवसापासून जम्मू-काश्मीरमधील कुलगाममध्ये झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांनी ५ दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. हि घटना गुरुवारी घडली असल्याचे समजते. यामध्ये सुरक्षा दलाला मोठे यश मिळाले आहे. ठार झालेल्या दहशतवाद्यांची संख्या आणखी वाढू शकते. गुरुवारी दुपारी ही चकमक सुरू झाल्याचे जम्मू-काश्मीर पोलिसांनी सांगितले. डीएच पोरा भागातील सामनो पॉकेटमध्ये ही चकमक झाली. त्यात राष्ट्रीय रायफल्स, पोलीस आणि सीआरपीएफच्या जवानांचा देखील समावेश होता.दहशतवाद्यांना घेरल्यानंतर सुरक्षा दलांनी गावाभोवती दिवे लावण्यात आले होते. जेणेकरून ते पळून गेल्यावर त्यांच्यावर लक्ष ठेवता येईल

घुसखोरीच्या प्रयत्नादरम्यान हे दहशतवादी मारले गेल्याचे सुरक्षा दलाच्या सूत्रांचे म्हणणे आहे. याआधी 15 नोव्हेंबरलाही सुरक्षा दलांनी उरी सेक्टरमध्ये घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडला होता.घुसखोरी रोखण्यासाठी सुरक्षा दलांनी ‘ऑपरेशन काली’ सुरू केले होते. दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत बशीर अहमद मलिकसह दोन जण ठार झाल्याचे लष्कराने सांगितले होते. हे दहशतवादी पाकिस्तानातून आले होते आणि जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद पसरवण्याचा प्रयत्न करत होते.

काश्मीर झोन पोलिसांनी ट्विटरवर पोस्ट करत सांगितले की, ‘कुलगाम पोलीस, लष्कर आणि सीआरपीएफने 5 दहशतवाद्यांना ठार केले आहे. शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत. ऑपरेशन अंतिम टप्प्यात आहे. सध्या संपूर्ण परिसराचा शोध सुरू आहे.सध्या सुरक्षा दलांनी संपूर्ण परिसराचे छावणीत रुपांतर केले असून कडक पाळत ठेवली जात आहे. ही कारवाई कालच सुरू झाली होती, मात्र रात्री काही काळ थांबवण्यात आली. सुरक्षा दलांनी सांगितले की, शुक्रवारी सकाळी गोळीबार सुरू असताना दहशतवादी तळ ठोकून असलेल्या घरात आग लागली’.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम