शिवसेनेचे यश ; म्हणून आज पंतप्रधान मोदी करणार उद्धाटन – राऊत !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । १९ जानेवारी २०२३ । पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबई दौऱ्यावर येत आहेत. मुंबईत विविध विकास कामांचे भूमीपूजन पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते होणार आहे. या पार्श्वभूमीवर खासदार संजय राऊत यांच्याकडून सातत्याने आम्ही केलेल्या कामांचेच आज उद्धाटन होत असल्याची टीका होत आहे. आज सकाळी संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला.

शिवसेनेने महानगरपालिकेत ज्या कामांची पायाभरणी केली त्याच कामांचे उद्धाटन करण्यासाठीच प्रधानमंत्री येत आहे. शिवसेनेने सुरु केलेल्या कामांना जी गती मिळाली त्यामुळेच भारतीय जनता पक्षाला आज त्यांच्या प्रचाराचे भूमिपुजन करता येत आहे. अशी टीका शिवसेना नेते तथा खासदार संजय राऊत यांनी भाजपवर केली आहे. राऊत भारत जोडो विषयी म्हणाले, भारत कश्मिरपासून कन्याकुमारीपर्यंत एक आहे. त्यामुळे शिवसेनेची पाऊले उमटली पाहिजेत. त्यामुळे सुरुवातीपासून अंतिम टप्प्यापर्यंत सहभागी होऊ. 2 दिवस जम्मु काश्मिरला जाणार आहे. त्याठिकाणी हजारो काश्मिरी पंडीत सरकार विरोधात आंदोलन करत आहे. मी त्याठिकाणी जाऊन त्यांची भेट घेणार आहे.

संजय राऊत पुढे बोलताना म्हणाले, काश्मिरी पंडीतांसोबत चर्चा करणार आहे. विस्थापितांच्या शिष्टमंडळाला भेटेल. राहुल गांधींनी भारत जोडो यात्रेद्वारे ऐतिहासिक कार्यक्रम घेतला. साडेचार हजार किलोमीटरपेक्षा जास्त चालत प्रवास करणे हे सोप्पे नाही. त्यामुळे संपूर्ण देश मनाने आणि भावनेने जोडला पाहिजे. देशातील द्वेष आणि सूडाची भावना संपायला हवी. हा राहुल गांधींचा उद्देश आहे. आणि राजकीय मतभेद बाजूला सारुन आम्ही यात सहभागी होऊन पाठिंबा देणार.

संजय राऊत यांनी यावेळी पंतप्रधानांना विनंती केली. ते म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कर्नाटकातून येताना बेळगावसह ज्या सीमाभागात मराठी बांधवांवर अत्याचार सुरु आहे. त्या संदर्भात पंतप्रधानांनी तिकडच्या मुख्यमंत्र्यांना सूचना द्याव्यात. यापुढे मराठी बेळगाववासियांवर अन्याय होता कामा नये. पंतप्रधान आपल्या शहरात येत आहे. चांगली गोष्ट आहे. त्यांना कोणी विरोध करत नाहीये. त्यांचे स्वागत करायला हवे. शिवसेनेने महानगरपालिकेत ज्या कामांची पायाभरणी केली त्याच कामांचे उद्धाटन करण्यासाठीच प्रधानमंत्री येत आहे. अडथळे पार करत शिवसेनेने सुरु केलेल्या कामांना जी गती मिळाली त्यामुळेच भारतीय जनता पक्षाला या कामांच्या उद्घाटनाची संधी आज मिळत आहे. शिवसेनेच्या कामांमुळेच त्यांना आज त्यांच्या प्रचाराचे भूमिपुजन करता येत आहे. संजय राऊत म्हणाले, हे शिवसेनेचे यश आहे. आम्ही जी कामे केली आहेत. ती कामे मी मोजून दाखवू शकतो. आमचे जे माजी महापौर आहेत, सुनील प्रभु आहेत त्यांना विचारा. असा पुनरुच्चार संजय राऊत यांनी यावेळी केला.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम