पाकिस्तानच्या हवाई तळावर आत्मघातकी हल्ला !

बातमी शेअर करा...

बातमीदार | ४ नोव्हेबर २०२३

जगभरातील अनेक ठिकाणी हल्ले सुरु असतांना आज सकाळी पाकिस्तानमध्ये देखील हवाई तळावर हल्ला झाल्याची घटना घडली आहे. पंजाब प्रांतात असलेल्या मियांवली हवाई तळावर दहशतवादी हल्ला झाला असून सशस्त्र आत्मघाती हल्लेखोर हवाई दलाच्या प्रशिक्षण तळात घुसत त्यांनी इंधन टॅकर आणि तीन विमानांना नष्ट केली. दरम्यान पाकिस्तानच्या सैन्याने भिंत ओलांडून आलेल्या ९ दहशतवाद्यांना ठार केलं आहे.

या दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी तहरीक-ए- जिहाद पाकिस्तानने घेतलीय. ठार झालेले दहशतवाद्यांनी हवाई तळाच्या संरक्षण भिंतीला सिडी लावून ते आतमध्ये घुसले होते. जिओ न्यूजला पाकिस्तानी हवाई दलाने दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानच्या सैनिकांनी दहशतवाद्यांचा मोठा कट उधळून लावला. हवाई दलाच्या आत आणि आजूबाजूच्या परिसरात मोहीम राबवत ९ दहशतवाद्यांना ठार केलं. या हल्ल्यात एक इंधन टॅकर आणि तीन विमानांचं नुकसान झालंय.

तहरीक-ए-जिहाद एक दहशतावादी संघटना आहे. ही एक घोस्ट संघटना आहे, कारण या दहशतवादी संघटनाविषयी अधिक माहिती कोणालाच नाहीये. याआधी तहरीक-ए-जिहादने चमन, बोलान, स्वातच्या परिसरात झालेल्या लकी मरूतमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यांची जबाबदारी घेतलीय. तर काही माध्यमांच्या मते, या संघटनेचा काही हल्ल्यांमध्ये समावेश नव्हता, तरीही या संघटनेने अनेक दहशतवादी हल्ल्यांची जबाबदारी घेतलीय.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम