पाकिस्तानात आत्मघाती स्फोट ; ४४ ठार !
बातमीदार| ३१ जुलै २०२३ | रविवारी एका कट्टर इस्लामी राजकीय पक्षाच्या अधिवेशन पाकिस्तानच्या खैबर पख्तुनख्वा प्रांतात सुरु होते यात आलेल्या आत्मघाती स्फोटात सुमारे ४४ जण ठार झाले, तर किमान २०० जण जखमी झाले. दरम्यान, या प्राणघातक हल्ल्याची जबाबदारी अद्याप कोणत्याही गटाने स्वीकारलेली नाही.
बाजौरमधील खार येथे ‘जमियत उलेमा-ए-इस्लाम-फजल’च्या (जेयूआय-एफ) कार्यकर्ता अधिवेशनामध्ये संध्याकाळी ४ वाजण्याच्या सुमारास हा स्फोट झाल्याचे पोलिसांनी सांगितले. स्फोट झाला तेव्हा अधिवेशनात ५००हून अधिक जण उपस्थित होते. स्फोटात सुमारे ४४ जण ठार झाले असून, २०० लोक जखमी झाले असल्याचे रुग्णालयातील सूत्रांनी सांगितले.
पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी या आत्मघाती हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध केला. ‘इस्लाम, पवित्र कुराण आणि पाकिस्तानचे समर्थन करणाऱ्यांना दहशतवाद्यांनी लक्ष्य केले. या हल्ल्यात सहभागी असलेल्यांना कठोर शिक्षा केली जाईल. दहशतवादी हे पाकिस्तानचे शत्रू असून त्यांचा खात्मा केला जाईल’, असे शरीफ यांनी पंतप्रधान कार्यालयाने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम