सर्वोच्च न्यायालयाची तारीख पे तारीख ; ‘शिवसेनेचा’ १४ रोजी होणार सुनावणी !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । १० जानेवारी २०२३ राज्यात शिवसेना कुणाची यावर सत्ता संघर्ष अनेक दिवसापासून सुरु होता आणि तो आता पुढेही सुरु राहणार असल्याचे चित्र दिसत आहे. यावर आजही खरी शिवसेना कोणाची? या सत्तासंघर्षावर सुनावणी आज सुप्रीम कोर्टात पार पडली.

सर्वोच्च न्यायालयात शिवसेनेच्या ठाकरे गटाने सात सदस्यांच्या घटनापीठाकडे हे प्रकरण देण्याची मागणी केली. ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी ही मागणी केली. यावेळी न्यायालयाने ही सुनावणी १४ फेब्रवारी रोजी घेण्याचा निर्णय दिला. आता शिंदे गट व ठाकरे गटातर्फे दाखल सर्व याचिकांवर सात सदस्यीय की पाच सदस्यीय पिठाकडे हे प्रकरण जाते, हे ठरणार आहे.
१४ फेब्रुवारीपासून सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठासमोर सलग ही सुनावणी घेण्यात येणार आहे, अशी माहिती शिवसेना नेते संजय राऊत यांनी दिली. तसेच, व्हॅलेंटाईन डे दिवशी सुनावणी असल्याने सर्वकाही प्रेमाने होईल, असेही ते म्हणाले.
राज्यातील सत्तासंघर्षासंदर्भात दाखल विविध मुद्यांवर ठाकरे गटाला या खटल्यात सात न्यायमूर्तींचे खंडपीठ हवे आहे. त्यात १६ आमदारांच्या अपात्रतेच्या कारवाईबाबत मुख्य मुद्दा आहे. विधानसभेचे पीठासीन अध्यक्षांवर अविश्वासाचा प्रस्ताव दाखल असताना त्यांना हा अधिकार आहे की नाही हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम