
सुश्मिता सेन हृदयविकाराचा झटक्यानंतर पुन्हा रणागणात !
दै. बातमीदार । २५ एप्रिल २०२३ । बॉलीवूडमध्ये नेहमीच आपल्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असलेली अभिनेत्री सुश्मिता सेनला गेल्या काही दिवसापूर्वी हृदयविकाराचा झटका आला होता. वयाच्या 47 व्या वर्षी अभिनेत्रीला हृदयविकाराचा झटका आल्याने अनेकांना धक्का बसला होता.
प्रत्येकजण तिच्याबद्दल चिंता व्यक्त करत होते. दरम्यान सुश्मिता आता आजारातून बरी झाली असून तीने दैनंदिन कामकाजाला सुरुवात देखील केली. याचदरम्यान सुश्मिताचा आर्या 3 मधील तिच्या लूकचा पहिला व्हिडिओ शेअर केला आहे. आर्या 3 च्या व्हिडीओमध्ये सुश्मिचा किलर लूक प्रचंड व्हायरल होत आहे.
सुश्मिता सेनची पहिली ‘आर्या’ ही वेब सीरिज चांगलीच गाजली होती. या वेब सीरिजमधून सुश्मिताने कमबॅक केले होते. या वेबसिरीजचे आतापर्यंत 2 सीझन प्रदर्शित झाले असून ज्यात सुश्मिताचा दमदार परफॉर्मन्स पाहायला मिळाला. त्यानंतर पुन्हा एकदा सुश्मिता तिसऱ्या सिझनमधून प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाली आहे. नुकताच या वेब सिरीजच्या तिसऱ्या सीझनचा टीझर रिलीज करण्यात आला आहे. आर्या सीझन 3 च्या घोषणेनंतर चाहते खूप आनंदी दिसत आहेत. इतकंच नाही तर सुश्मिता सेनचा हा डॅशिंग लूक खूपच कूल वाटत आहे.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम