श्री स्वामी नरेंद्रजी महाराज यांचा अमळनेरात 22 रोजी पादुका दर्शन सोहळा… दाजीबा नगराजवळ कार्यक्रमाची जय्यत तयारी सुरू…,
अमळनेर-(अबिद शेख)अनंत श्री विभूषित जगद्गुरू रामानंदचार्य श्री स्वामी नरेन्द्राचार्यजी महाराज (जगद्गुरू रामानंदचार्य दक्षिण पीठ, नाणीजधाम,महाराष्ट्र) यांच्या पादुका दर्शनाचा सोहळा गुरुवार दि 22 सप्टेंबर रोजी अमळनेर येथे आयोजीत करण्यात आला आहे.
या सोहळ्याची जय्यत तयारी सुरू असून बेटावद नरडाना रोडवरील दाजीबा कॉलनीत श्रीमती रजनी रघुनाथ केले यांच्या मैदानावर सकाळी 10 पासून हा सोहळा होणार आहे.स्व.स्वरूप संप्रदाय जि.पश्चिम जळगाव यांनी हा सोहळा आयोजित केला आहे.पादुका व गुरूपूजन सोहळ्यात श्रींचे पादुकांचे आगमन,सामाजिक उपक्रम,गुरुपूजन,आरती सोहळा,प्रवचन,उपासक दीक्षा,दर्शन,पुष्पवृष्टी आदी धार्मिक कार्यक्रम पार पडणार आहेत.
कार्यक्रमात उपस्थिती देऊन अध्यात्मिक अनुभव घ्या,,
सध्याच्या धावपळीच्या युगात माणूस यंत्रवत बनत चालला आहे. विज्ञानामुळे भौतिक सुखांची मांदियाळी त्याच्या पायाशी लोळण घेत आहे. एका अर्थाने माणसाथी प्रगतीच होत आहे. हे जरी खरे असले तरी सुखाच्या हिरवळीवर लोळण घेणारा माणूस अंत:करणातून मात्र कधी कधी हताश, निराश झालेला आढळतो. कारण आहे मन:शांतीचा अभाव, आत्मिक सुखाचा अभाव, भौतिक सुखे कितीही असली तरी आत्मिक समाधान है।काही वेगळेच असते. आत्मिक समाधानाशिवाय जीवाला पूर्ण समाधान मिळत नाही.
यासाठी सांप्रत काळात गुरुमागनि जातून आत्मोन्नती साधता येते. ज्यांना ही उच्च कोटीची पर्वणी साधायची नसेल त्यांनी गुरुमागनि आत्मिक सुख, मन:शांती मिळवायला काय
हरकत आहे?गुरुमार्ग म्हटला की नवविधा भक्ती आली. या भक्तीच्या मार्गाने आपल्यातील
सकारात्मक उर्जा पुनर्जिवीत करून जीवनाचा आनंद घ्या. आपल्यातील सकारात्मक उर्जा
जागृत होणे म्हणजेच वीलपॉवर वाढणे. उपासना केल्यामुळे जीवन जगताना संयम, समय
सूचकता, नेतृत्व गुण, परिपकता, चिकाटी, दूरदृष्टीकोन अशा विविध अंगांनी माणूस विकसित होतो. उपासना, माणसातील सकारात्मक विविध अंग विकसित करून त्या
माणसामध्ये आमुलाग्र बदल घडवते. ज्यायोगे आपल्या हातून परोपकार, लिनता, शूरता,
ध्यैर्य या गोष्टी अंगीभूत होवून आपल्यामध्ये माणूसकी नावाचा धर्म प्रत्ययास येतो. आजवर
अनेकांनी तशी प्रचिती अनुभवली आहे.आपल्यातील श्रद्धा उपासनेच्या माध्यमातून गुरुचरणी अर्पण करून दिव्य,
महन्मंगल आनंदाचा अनुभव घ्या. जगद्गुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज
नेहमीं सांगतात ‘डोळे विज्ञानवादी, मन अध्यात्मवादी आणि बुद्धी वास्तववादी ठेवा’, या त्रिसुत्रीने जीवनात सुख, शांती, समाधान, स्थैर्य, प्रगती साधता येईल. अंधश्रद्धा माणसाला अज्ञानाकडे घेवून जातात. परंतु जी व्यक्ती वरील त्रिसूत्रीचा वापर आपल्या जीवनात करतात,अशा व्यक्ती जीवनाच्या वाटेवर चालत असताना हताश होताना दिसणार नाहीत.सुखात हुरवाळून जाणार नाहीत वा दुःखात कोलमडून पडणार नाहीत. सुखदुःखात
खंबीरपणे जगण्याची उमेद उपासनेमुळे येते. आपल्यातील तमोगुण, रजोगुण मानवतेला
लाजीरवाणे वाटणारे जीवन जगायला भाग पाडतात. परंतु आपल्यातील सत्त्वगुण
जगण्यामध्ये सकारात्मक दृष्टीकोन निर्माण करतो. जगण्याची उमेद वाढते. सात्त्विकतेमुळे जीवनाकडे बघण्याचा दृष्टीकोनच बदलतो. माणूस खऱ्या अर्थाने माणूस म्हणून जगण्यास सात्विकताच कारणीभूत असते, असे अनेक साधुसंतांच्या प्रवचनांमधून ऐकावयास मिळते. आपण ही या उपासना कार्यक्रमात उपस्थिती लावून आध्यात्मिक शांतीचा अनुभव घ्यावा. याकरता हे सस्नेह निमंत्रण असल्याचे आयोजकांनी म्हटले आहे.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम