स्वामी समर्थ मंदिर परिसर सीसीटीव्हीं च्या निगरानीत.. नागरिकांनी व भक्तांनी डीवायएसपी जाधव साहेबानचे मानले आभार..

बातमी शेअर करा...

(आबिद शेख) अमळनेर मंदिर परिसर आणि शाळेतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी लोकसहभागातून स्वामी समर्थ मंदिराजवळ सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले. त्यामुळे पालक व नागरिकांनी समाधान व्यक्त केले.
स्वामी समर्थ मंदिरात महिला ,मुली ,बालके ,तरुण,वृद्ध सर्व प्रकारच्या भक्तांची गर्दी होत असते. तसेच याच भागात जी एस हायस्कूल तसेच इंदिरा गांधी प्राथमिक ,एन टी मुंदडा ,पी एन मुंदडा अशा चार शाळा असून दवाखाने व दुकाने देखील असल्याने किरकोळ चोऱ्या ,छेडखानी ,टवाळ मुलांचा त्रास रोखण्यासाठी,दवाखान्यातील गोंधळाला प्रतिबंध घालण्यासाठी डीवायएसपी राकेश जाधव यांनी पुढाकार घेत या परिसरात उत्तम दर्जाचे फोर के सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यासाठी आग्रह धरला. परिसरातील नागरिकांची बैठक घेऊन त्यांना आर्थिक सहभागाचे आवाहन केले. स्वतः डीवायएसपी राकेश जाधव यांनी १० हजार रुपये मदत केली , त्यांच्या सह उद्योगपती बिपीन पाटील ,डॉ विशाल बडगुजर , डॉ पुरुषोत्तम सुर्यवनशी ,दीपक पाटील ,सुनील चौधरी ,मेघराज दाभाडे यांचेसह अनेकांचे योगदान मिळाले. लक्ष्मीपूजन निमित्त कॅमेऱ्यांचे पूजन व लोकार्पण करण्यात आले. यावेळी डीवायएसपी जाधव यांनी शहरात इतर बसवलेल्या कॅमेऱ्यांमुळे चोऱ्या करणारे गुन्हेगार कसे सापडले आणि दंगलीत खरे आरोपी कसे पकडण्यात आले याबाबत नागरिकांना महत्व पटवून दिले. अनेकदा चोर चोऱ्या करून डीव्हीआर देखील चोरून नेतात म्हणून डीव्हीआर कोणाकडे ठेवला आहे याचीही गुप्तता पाळण्यात आली आहे. सूत्रसंचालन विनोद कदम यांनी केले. यावेळी दिपक मेडिकल चे संचालक दीपक पाटील, बाळासाहेब देशमुख,राजेश कोठावदे,जितू देशमुख,उमेश पाटील,राजू दाभाडे, दीपक काटे ,जगदीश पाटील, अल्का गोसावी, पद्माकर अप्पा, गजू साळुंखे,उज्ज्वल पाटील ,बी एस एन एल चे दिलीप पाटील हजर होते. कॅमेरे बसवल्यामुळे नागरिकानी व भक्तांनी डीवायएसपी जाधव यांचे आभार मानले.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम