आंदोलन करणे राष्ट्रवादीला भोवले; गुन्हा दाखल

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । ८ नोव्हेबर २०२२ राज्यातील शिंदे गटाचे मंत्री अब्दुल सत्तार यांनी केलेल्या बेताल वक्तव्याबद्दल राष्ट्रवादीने राज्यात तीव्र निर्देशने केली होती, मुंबईतील मंत्री सत्तार यांच्या घराबाहेर राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं होतं, यावेळी सत्तारांच्या घरावर दगडफेकही करण्यात आली होती. हे आंदोलन करणं आता या पदाधिकऱ्यांना भोवलं आहे, कारण त्यांच्यावर विविध कलमांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

 

गुन्हा दाखल झालेल्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये विद्या चव्हाण, अदिती नलावडे, राष्ट्रवादी युवा काँग्रेसचे प्रमुख मेहबुब शेख यांच्यासह १५ पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अब्दुल सत्तार यांच्या घरासमोर आंदोलन केल्याप्रकरणी त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. बेकायदा गर्दी जमवल्याप्रकरणी भादंवि कलम १४३सह इतर अनेक कलमांतर्गत त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मुंबई पोलिसांनी ही कारवाई केली आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम