तहसीलदार यांच्याकडून गणपती विसर्जन व रथ उत्सवाच्या मार्गाची संयुक्त पाहणी

बातमी शेअर करा...

पारोळा (प्रतिनिधी प्रतिक मराठे) दि. ३० रोजी पारोळा शहरातील गणपती विसर्जन मिरवणुक मार्ग व बालाजी महाराज रथ उत्सवाच्या मार्गाची संयुक्त पणे पाहणी करण्यात आली.

तहसीलदार डॉ उल्हास देवरे यांनी

नगर परिषदचे मुख्याधिकारी किशोर चव्हाण यांना कोणता रस्ता कसा तात्काळ पूर्णपने दुरुस्त करायचा आहे याबद्दल निर्देश दिले. तसेच रथ उत्सवात महावितरणची उपाय योजणे बद्दल महावितरण चे विभाग प्रमुख मोरे यांच्याशी जागेवर चर्चा करण्यात आली. तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न संबंधी पोलीस निरीक्षक पवार यांना सांगितले.

संपूर्ण मार्ग भ्रमण करताना पोलीस निरीक्षक पवार, मुख्याधिकारी किशोर चव्हाण, वीज वितरण विभागाचे मोरे उपस्थित होते

सदर मार्गाची पाहणी झालेवर महावीर नगर व विचखेडा येथील विसर्जन ठिकाणी जाऊन पाहणी करण्यात आली. तसेच नगरपालिका प्रशासन व वीज वितरण कंपनी यांनी आवश्यक उपाययोजना तात्काळ वेळेवर पूर्ण करण्यास तहसीलदार डॉ उल्हास देवरे यांनी सांगितले.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम