दीर्घ आयुष्य जगण्यासाठी १० मिनिटे वेळ काढाच !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । २ नोव्हेबर २०२२ सध्याच्या काळात तरुणासह सर्वच लोक आपल्या विविध कामामध्ये व्यस्त असतात, त्यांना आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी वेळच नसतो अशा परिस्थितीत एकतर आपल्याला व्यायामासाठी वेळ मिळत नाही किंवा आपण त्यापासून दूर पळतो. तुमचीही अशीच परिस्थिती असेल तर अमेरिकेतील सिडनी विद्यापीठाने तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आणली आहे. एका नवीन अभ्यासानुसार, दर आठवड्याला फक्त 10 मिनिटांचा जोमदार व्यायाम तुम्हाला दीर्घ आयुष्य जगण्यास मदत करू शकेल, असा दावा अभ्यासाद्वारे विद्यापीठातील तज्ज्ञांनी केला आहे.

संशोधकांच्या टीमने यूके बायोबँकच्या 70 हजारांहून अधिक लोकांच्या डेटाचे विश्लेषण केले. ज्यात त्यांचे वय 40 ते 69 दरम्यान होते. त्यांना कर्करोग, हृदयविकार असा कोणताही आजार नव्हता. अभ्यासातील सर्व सहभागींना अ‍ॅक्टिव्हिटी ट्रॅकर घालण्यास सांगण्यात आले. यासह आठवडाभर त्याच्या शारीरिक हालचालींची माहिती गोळा करण्यात आली. त्यानंतर शास्त्रज्ञांनी सरासरी 7 वर्षे सर्व सहभागींच्या आरोग्य नोंदींचे अनुसरण केले. यावेळी त्यांना जोमाने व्यायाम, कर्करोग आणि हृदयविकार यासारखे गंभीर आजार आणि मृत्यूची शक्यता यांच्यातील संबंधांवर लक्ष ठेवण्यात आले.

जोमदार व्यायाम म्हणजे कोणतीही शारीरिक क्रिया ज्यामध्ये एखाद्या व्यक्तीचा श्वास वेगवान होतो. अशी कृती करणारी व्यक्ती एकाच वेळी अनेक शब्द उच्चारू शकत नाही. पुन्हा बोलण्यासाठी मधेच एक श्वास घेते. याची उदाहरणे म्हणजे पोहणे, चढांवर सायकल चालवणे, पायऱ्या चढणे, इत्यादी. शास्त्रज्ञांना असे आढळून आले की, विश्रांतीच्या वेळी व्यायाम करण्याऐवजी जोमाने व्यायाम केल्याने लोकांचे आरोग्य सुधारते. तुम्ही कमी कालावधीसाठी जलद व्यायाम केला तरी तुम्हाला फायदा होईल. अभ्यासात अजिबात व्यायाम न करणाऱ्या लोकांचा पुढील 5 वर्षांत मृत्यू होण्याचा धोका 4% होता. त्याचवेळी, आठवड्यातून 10 मिनिटे जोमदार व्यायाम करणाऱ्यांमध्ये हा धोका 2% आणि 60 मिनिटे व्यायाम करणाऱ्यांमध्ये 1% असल्याचे आढळून आले.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम