उन्हाळ्यात घ्या असाही काळजी !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । ३० मार्च २०२३ ।  राज्यात फेब्रुवारी महिन्यापासून उन्हाळा सुरु होत असतो या काळात उन्हाचे चटके बसू लागल्याने बाजारात शांतता देखील पाहायला मिळत असते. अशावेळी तुम्ही जर बाजारात जावून आले तर तुम्हाला तुमची व चेहऱ्याची काळजी घेणे खूप महत्वाचे आहे. उन्हाळ्यामध्ये सूर्यप्रकाश, धूळ, माती, प्रदूषण आणि घाम या सर्व गोष्टींमुळे त्वचेला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते.

उन्हाळ्यामध्ये त्वचा काळी दिसायला लागते त्यामुळे त्वचेचे सौंदर्य कमी होते. म्हणून उन्हाळ्यामध्ये त्वचेची विशेष काळजी घेणे खूप महत्त्वाचे असते. यासाठी बहुतांश लोक बाजारामध्ये उपलब्ध असलेल्या महागड्या उत्पादनांचा वापर करतात. मात्र, ही उत्पादने त्वचेसाठी हानिकारक ठरू शकतात. त्यामुळे त्वचेची काळजी घेण्यासाठी तुम्ही काही घरगुती उपायांचा अवलंब करू शकतात. हे घरगुती उपाय केल्याने त्वचेला कोणत्याही प्रकारची हानी होत नाही. उन्हाळ्यामध्ये त्वचेची काळजी घेण्यासाठी तुम्ही खालील घरगुती उपाय करू शकतात.

कोरफड
उन्हाळ्यामध्ये चेहऱ्याची काळजी घेण्यासाठी कोरफड उपयुक्त ठरू शकते. कोरफड थंड असते. त्याचबरोबर कोरफड त्वचेचे उन्हापासून संरक्षण करतात. उन्हाळ्यामध्ये त्वचेची काळजी घेण्यासाठी तुम्हाला कोरफडीचा गर साधारण वीस मिनिटे चेहऱ्यावर लावून ठेवावे लागेल. त्यानंतर तुम्हाला तुमचा चेहरा सामान्य पाण्याने धुवावा लागेल उन्हाळ्यामध्ये दररोज कोरफडीचा गर चेहऱ्यावर लावल्याने त्वचा निरोगी राहू शकते.

चंदन पावडर
चंदन पावडर थंड असते. त्यामुळे उन्हाळ्यामध्ये चेहऱ्याची काळजी घेण्यासाठी तुम्ही चंदन पावडरचा वापर करू शकतात. चंदर पावडरच्या मदतीने पिंपल्स दूर होण्यास मदत होते. त्याचबरोबर चंदन पावडर चेहऱ्याला कुलिंग इफेक्ट प्रदान करते. नियमित चंदन पावडरच्या वापरामुळे त्वचेचा रंग सुधारतो आणि त्वचेवरील चमक देखील वाढते.

मुलतानी माती 

उन्हाळ्यामध्ये चेहऱ्याला मुलतानी माती लावणे फायदेशीर ठरू शकते. तेलकट त्वचेसाठी मुलतानी माती उपयुक्त मानली जाते. चेहऱ्याला थंड ठेवण्यासाठी मुलतानी माती मदत करू शकते. यासाठी तुम्हाला दोन चमचे मुलतानी मातीमध्ये आवश्यकतेनुसार गुलाब जल मिसळून पेस्ट तयार करून घ्यावी लागेल. ही पेस्ट तुम्हाला साधारण पंधरा मिनिटे चेहऱ्यावर लावून ठेवावी लागेल. त्यानंतर तुम्हाला तुमचा चेहरा स्वच्छ पाण्याने धुवावा लागेल. दररोज मुलतानी मातीचा वापर केल्याने कोरड्या त्वचेची समस्या दूर होऊ शकते. उन्हाळ्यामध्ये चेहऱ्याची काळजी घेण्यासाठी तुम्ही वरील पद्धतींचा वापर करू शकतात. त्याचबरोबर चेहऱ्यावरील डाग दूर करण्यासाठी तुम्ही बडीशेपचा खालील पद्धतीने वापर करू शकतात.

बडीशेप
त्वचेची काळजी घेण्यासाठी तुम्ही सकाळी रिकाम्या पोटी बडीशेपचे सेवन करू शकतात. बडीशेपमध्ये आढळणारे गुणधर्म शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढून टाकण्यास मदत करतात आणि त्वचेला चमकदार बनवतात. यासाठी तुम्हाला दररोज सकाळी रिकाम्या पोटी एक चमचा बडीशेपचे सेवन करावे लागेल. नियमित सकाळी रिकाम्या पोटी बडीशेपचे सेवन केल्याने चेहऱ्यावरील डाग सहज निघून जाऊ शकतात.

बडीशेपचे पाणी
बडीशेपचे पाणी प्यायल्याने शरीराच्या अनेक समस्या सहज दूर होऊ शकतात. बडीशेपच्या पाण्यामध्ये आढळणारे अँटीसेप्टिक गुणधर्म बॅक्टेरियाशी लढतात आणि त्वचेवरील घाण साफ करण्यास मदत करतात. यासाठी तुम्ही नियमित बडीशेपच्या पाण्याचे सेवन करू शकतात किंवा हे पाणी कोमट करून त्याने चेहरा साफ करू शकतात.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम