फादर्स डे ला वडिलांची अशी घ्या काळजी !
दै. बातमीदार । १८ जून २०२३ । दरवर्षी प्रमाणे यंदाही फादर्स डे जगभर मोठ्या उत्साहात साजरा केला जात असतो यावर्षी फादर्स डे 18 जूनला आहे. आज जर तुम्हाला तुमच्या वडिलांना काही चांगली भेटवस्तू द्यायची असेल तर कपडे, मोबाईल आणि इतर गॅजेट्स व्यतिरिक्त तुम्ही आर्थिक गोष्टी देऊ शकता, जेणेकरून त्यांना नंतर कोणत्याही प्रकारच्या आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागणार नाही. आर्थिक स्थिती सुधारण्यासोबतच गरजेच्या वेळी या भेटवस्तूंची मदत होऊ शकते. तुमच्या वडिलांची आर्थिक उद्दिष्टे पूर्ण करू शकणार्या पाच आर्थिक भेटवस्तूंबद्दल जाणून घ्या.
चांगल्या आरोग्यासाठी आरोग्य विमा:
तुमचे वडील वृद्ध असल्यास, तुम्ही त्यांना आरोग्य विमा भेट देऊ शकता. वृद्धांसाठी आरोग्य विमा काढणे सोपे नाही, परंतु भेटवस्तू म्हणून दिल्यास ते गरजेच्या वेळी उपयोगी पडेल आणि तुमचा वैद्यकीय खर्च कमी करेल. अनेक कंपन्या ज्येष्ठ नागरिकांचे आरोग्य तपासल्यानंतर त्यांना आरोग्य विमा देतात.
आपत्कालीन निधी तयार करण्यास मदत करा:
आपत्कालीन निधी, नोकरी गमावणे, वैद्यकीय खर्च, घर दुरुस्ती इत्यादींसाठी वापरता येईल. तुम्ही 1 ते 5 लाख रुपये वाचवू शकता असा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे.
जर तुमच्याकडे ही रक्कम नसेल, तर तुम्ही तुमच्या जोखमीच्या क्षमतेनुसार शॉर्ट टर्म इक्विटी, म्युच्युअल फंड किंवा इतर योजनांमध्ये गुंतवणूक करू शकता. तसेच, तुम्ही SIP द्वारे थोडी-थोडी गुंतवणूक करू शकता.
कर्जाची रक्कम परत करा:
जर तुमच्या वडिलांच्या नावावर कोणतेही कर्ज असेल तर त्या कर्जाची परतफेड करणे ही सर्वात चांगली भेट असेल. त्यामुळे त्यांचा आर्थिक भार कमी होईल.
तुमच्या वडिलांच्या नावाने SIP सुरू करा:
तज्ज्ञांच्या मते, तुम्ही तुमच्या वडिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी SIP सुरू करू शकता आणि दीर्घकालीन गुंतवणूक करून एक चांगला फंड तयार करू शकता, जो त्यांच्या भविष्यासाठी उपयुक्त ठरेल.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम