थंडीत ‘या’ टिप्स फोलो करत घ्या ओठाची काळजी !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । १६ नोव्हेबर २०२२ दिवाळीनंतर सर्वत्र थंडीचा तडाखा जाणवायला लागतोच व हिवाळ्यात भरपूर लोकांना आरोग्याबाबत त्रास हि होत असतो तसेच ओठ फाटण्याची, कोरडे होण्याची समस्या जाणवू लागते. हिवाळा आला की लहान मुलांपासून, वृद्ध व्यक्तींपर्यंत सर्वांनाच फाटलेल्या ओठांचा त्रास होतो. तुम्ही कितीही क्रीम लावलं किंवा व्हॅसलीन वापरलं, तरी ओठ फुटण्याची प्रक्रिया सुरूच राहते. काही वेळा हिवाळ्यात ओठ इतके कोरडे होतात की ओठातून रक्तही येऊ लागते. यासाठीच थंडीत ओठ का कोरडे होतात आणि ते पूर्वीसारखे मुलायम आणि मऊ करण्यासाठी कोणते उपाय करावेत.

1. हिवाळ्यात ओठ फाटण्याची किंवा कोरडे होण्याची अनेक कारणे आहेत. परंतु, सर्वात मोठे कारण म्हणजे शरीरात पाण्याची कमतरता. हवामान थंड होताच आपण पाण्याचे सेवन कमी केले जाते. अशा स्थितीत शरीरातील आर्द्रता कमी होते आणि त्याचा परिणाम चेहरा आणि ओठांवर दिसून येतो.

2. हिवाळ्यात वाहणारा कोरडा वारा देखील ओठ फाटण्याचे कारण बनतो. अशा परिस्थितीत आपण अशी हवा टाळली पाहिजे.

3. जास्त वेळ उन्हात राहणे हे ओठ कोरडे होण्याचे आणखी एक कारण असू शकते असे तज्ज्ञांचे मत आहे.

4. हिवाळ्यात ओठ खूप कोरडे असतात, अशा परिस्थितीत जर आपण ओठांना वारंवार स्पर्श केला तर हे देखील ओठ फाटण्याचे कारण असू शकते.

5. लिपस्टिक लावल्याने देखील तुमच्या ओठांवर परिणाम होतो.

जरी बाजारात अशी अनेक उत्पादने उपलब्ध आहेत, ज्याचा वापर करून आपण आपल्या ओठांना मॉइश्चराइज करू शकतो. परंतु काही घरगुती उपायांचा अवलंब करून आपण नैसर्गिक पद्धतीने ओठांची काळजी घेऊ शकतो.

‘या’ टिप्स वापरून फाटलेल्या ओठांची काळजी घ्या

1. बदामाचे तेल : दररोज झोपण्यापूर्वी बदामाचे तेल लावा, त्यामुळे तुमचे ओठ फाटणार नाहीत आणि तुमचे ओठ संपूर्ण हिवाळ्यात गुलाबी आणि मऊ राहतील.

2. देसी तूप लावा : ओठांवर मध लावावे की ओठांना तडे जात नाहीत किंवा फाटलेले ओठ लवकर बरे होतात. तुम्हांला फाटलेल्या ओठांचा त्रास होत असेल तर हा घरगुती उपाय वापरा.

3. नारळ तेल : ओठांवर खोबरेल तेल वापरल्याने ओठांचा कोरडेपणा दूर होतो. औषधी गुणधर्मांनी समृद्ध नारळ तेल त्वचेला हायड्रेट करते आणि फाटलेल्या ओठांना आराम देते. कारण नारळाच्या तेलात असलेले अँटी-बॅक्टेरियल, अँटी-ऑक्सिडंट आणि अँटी-फंगल गुणधर्म त्वचेतील कोरडेपणा दूर करतात. मॉइश्चरायझिंग गुणधर्मांनी समृद्ध, खोबरेल तेल ओठांमध्ये आर्द्रता टिकवून ठेवते.

4. क्रीम लावा : जर तुम्हाला ओठ फाटण्याचा त्रास होत असेल तर दिवसातून दोन ते तीन वेळा ओठांवर क्रीम लावा. क्रीमने मसाज केल्याने ओठांचा कोरडेपणा दूर होतो. यामध्ये व्हिटॅमिन डी, व्हिटॅमिन बी, व्हिटॅमिन बी 12, कॅल्शियम सारखे घटक असतात, जे त्वचेचा कोरडेपणा दूर करण्यास आणि त्वचा निरोगी बनविण्यास मदत करतात.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम