अंडीसेवन करताना हि घ्या काळजी !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । २० नोव्हेबर २०२२ हिवाळ्यात अंड्याचे सेवन आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते. त्यामुळे डॉक्टरही आपल्याला अंडी खाण्याचा सल्ला देतात की रोज एक अंडी खावी. विशेषत: हिवाळ्यात आवर्जून आपण अंडी खायला हवी. अंड्यात असलेली प्रथिने तुमची हाडे मजबूत ठेवण्यास मदत करतात. अंड्याचे सेवन करताना आपण काही गोष्टींची विशेष काळजी घ्यायला हवी. आपण अनेकदा अंड्यासोबत काहीही खातो पण कधी कधी काही कॉम्बिनेशन जीवघेणेसुद्धा असतात. आज आम्ही तुम्हाला कोणत्या पदार्थांसह अंडी कधीही खाऊ नये हे सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.

अनेक ठिकाणी अंडी आणि भाजलेले मांस आपण एकत्र खातो. पण असं चुकूनही करु नये कारण भाजलेल्या मांसात आणि अंडीमध्ये भरपूर प्रथिने आणि फॅट असते, जे आपल्या सुस्तीचे कारण बनते.

अंड्यांसह सोया चुकूनही खाऊ नका. यामुळे आपल्या बॉडीमधील प्रोटीन्स शोषून घेण्याची क्षमता कमी होते. विशेषत: जिममध्ये जाणारे लोक अंड्यांसह सोया दूध पितात. त्यांनी विशेष काळजी घेणे गरजेचे आहे.

आपल्याला सकाळी नाश्तात अंडी खायची सवय असते. पण चुकूनही चहासोबत अंडी खाऊ नये. असे केल्यास तुम्हाला बद्धकोष्ठतेचा त्रास होऊ शकतो.

दुध किंवा दूधाच्या वस्तूंसोबत चुकूनही अंडी खावी नाही. विशेषत: चीज, दूध किंवा त्यापासून बनवलेल्या कोणत्याही गोष्टीसोबत अंडी खाणे टाळावे.

जर तुम्ही साखरेसोबत अंडी खात असाल तर आजच थांबवा. जेव्हा आपण साखर आणि अंडी एकत्र शिजवतो तेव्हा तेव्हा अमिनो अॅसिड तयार होते जे शरिरासाठी हानिकारक आहे. विशेष म्हणजे त्यामुळे ब्लड क्लॉटींग होण्याची दाट शक्यता असते.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम