दादांची बाजू घेत ताईनी विरोधकांना दिले चोख उत्तर !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । ३ जानेवारी २०२३ राज्यातील हिवाळी अधिवेशनात विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केलेल्या वक्तव्यामुळे राज्यातील भारतीय जनता पार्टी सर्वत्र आंदोलन सुरु केले आहे तर दुसरीकडे राष्ट्रवादीच्या खा.सुप्रियाताई सुळे हे नागपूर येथे बोलत असतांना विरोधकावर चांगली टीका केली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे म्हणाले कि, माझं शिक्षण मुंबईसारख्या ठिकाणी झालं. त्या ठिकाणी कधी जात, धर्म कधीच आड आले नाही, तसच माझ्या घरातही आणि माझं लग्न झाल्यानंतरही माझ्या जातीचा आणि धर्माचा कधी उल्लेख मला करावा लागला नाही. अशा घरात माझा जन्म झाल्यामुळेच मला माझं मत मांडण्याचा अधिकार मिळत गेला.

त्या सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त नागपूरमध्ये बोलत होत्या. खासदार सुप्रिया सुळे यांनी या सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त बोलताना त्यांनी महाराष्ट्रात होत असलेल्या बदलाबद्दलही आपले मत व्यक्त केले. सध्याच्या काळात चित्रपट, साहित्य, संस्कृतीनिमित्ताने होणारे विरोध आणि त्यावरून झालेल्या वादावर बोलतानाही त्यांनी जुन्या आणि नव्या काळाचा संदर्भ सांगितला.

जब्बार पटेल, विजय तेंडुलकर यांनी ज्या प्रकारे साहित्यनिर्मिती, चित्रपटनिर्मिती झाली ती आजच्या काळात जर केली असती तर लोकांसमोर आली असती का असा सवालही त्यांनी यावेळी केला. सध्याच्या काळात ज्या ज्या गोष्टीवरून वाद चालू आहे. त्या त्या गोष्टींवरून निर्माण झालेले वाद त्या त्या काळात का निर्माण झाले नाहीत. मुख्यमंत्र्यांविरोधात चित्रपट असतानाही मंत्रालय परिसरात चित्रपट निर्मिती झाली, सह्याद्री बंगल्यावरही चित्रीकरण करण्यात आले.

कारण त्या काळात सगळ्यांकडे एक प्रगल्भता होती असंही त्यांनी यावेळी सांगितले. सध्याच्या राजकारणाविषयी बोलताना त्यांनी रोहित पवार, आणि खासदार अमोल कोल्हे यांच्या वक्तव्याविषयी आणि त्यांच्या मांडणीविषयीही त्यांनी आपले मत व्यक्त केले. सध्या छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल अजित पवार यांनी केलेल्या वक्तव्याबद्दल खासदार अमोल कोल्हे यांनी व्यक्त केलेले मत हे इतिहासाच्या आधारावर त्यांनी कसं मांडले आहे यावर त्यांनी नव्या राजकीय नेत्यांची भूमिका मांडलेली दिसून आली.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम