राज्यातील तलाठी भरती पुन्हा चर्चेत ; परीक्षेपूर्वी सर्व्हर डाऊन !

advt office
बातमी शेअर करा...

बातमीदार | २१ ऑगस्ट २०२३ | राज्यातील सरकारने तरुणांसह तरुणीसाठी तलाठी भरतीचे आयोजन करण्यात आले होते. त्यापूर्वी मात्र नाशिक जिल्ह्यात पेपर फुटी प्रकरण चर्चेत असतांना आता पुन्हा एकदा प्रशासकीय व्यवस्था विद्यार्थ्यांच्या भवितव्याबाबत गंभीर नाही का? असा सवाल आता उपस्थित होतोय. कारण तलाठीपदाच्या परीक्षेत सावळा गोंधळ पाहायला मिळतोय. परिक्षेच्या आधी सर्व्हर डाऊन झाला आहे. त्यामुळे विद्यार्थी आक्रमक झाले आहेत. राज्यात अनेक ठिकाणी हीच परिस्थिती आहे. नागपुरात तलाठी भरती परिक्षेत सर्व्हर डाऊन झालं आहे. फक्त नागपुरातच नाही तर अकोला, अमरावती, लातूरमध्येही हीच परिस्थिती आहे.

अमरावतीतही तलाठी पदाच्या परीक्षेत सावळा गोंधळ पाहायला मिळतोय. नऊ वाजता सुरू होणारी परीक्षा अद्यापही सुरू झालेली नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये तीव्र संताप पाहायला मिळतोय. अमरावती शहरातील अनेक ऑनलाईन सेंटरवर ही परीक्षा होत आहे. विद्यार्थी सकाळी साडेसात वाजल्यापासून परीक्षा केंद्रावर हजर आहेत. मात्र नऊ वाजता परिक्षा सुरू होणार असताना आता 10 वाजून गेले तरी परिक्षा सुरू होत नाहीये. त्यामुळे विद्यार्थी मात्र आक्रमक झालेत.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम