मोदींच्या सभेत शिक्षक अनिवार्य ; कॉंग्रेसने केले ट्विट !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । १९ जानेवारी २०२३ । देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबई दौऱ्यावर आहेत. दरम्यान पंतप्रधान मोदींच्या सभेला मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांनी गर्दी केली आहे. पोलिसांनी ही माहिती दिली. पंतप्रधान गुरुवारी वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स येथील मैदानावर एका कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. दरम्यान मोदींच्या या सभेला मुंबईतील शाळा शिक्षकांची उपस्थिती अनिवार्य केल्याचा प्रकार समोर आला आहे. यावरून काँग्रेसने पंतप्रधान मोदी यांच्यासह शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा साधला आहे.

काँग्रेसचे नेते सचिन सावंत यांनी याबद्दल ट्विट करत मोदींच्या लोकप्रियतेतून गर्दी जमेल असा विश्वास राज्य सरकारला नसल्याचे स्पष्ट झाल्याचे म्हटले आहे. त्यांनी ट्विट केलं आहे की, “पंतप्रधानांच्या दौऱ्यासाठी मुंबईतील प्रत्येक शाळांनी एका शिक्षकाला पाठवणे अनिवार्य आहे असा संदेश शासनाने दिलेला दिसतो. पंतप्रधानांच्या तथाकथित लोकप्रियतेतून गर्दी जमेल यावर तथाकथित लोकप्रिय शिंदे फडणवीस सरकारचा विश्वास नाही हे यातून स्पष्ट होते.”

 

सचिन सावंत यांनी शाळांना पाठवण्यात आलेल्या कथित मेसेजचा स्क्रिनशॉट देखील शेअर केला आहे. ज्यामध्ये मुंबईतील सर्व शाळेतील प्रत्येक एका शिक्षकाला पंतप्रधान मोदी यांच्या सभेला उपस्थित राहणे अनिवार्य असल्याचे सांगण्यात आले आहे. पंतप्रधान मोदी हे मुंबईत सुमारे 38,800 कोटी रुपयांच्या प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी करणार आहेत. तसेच ते मुंबई मेट्रोच्या दोन मार्गांचे उद्घाटन करतील आणि मेट्रोचा आनंदही घेतील. ते सुमारे 12,600 कोटी रुपयांच्या मुंबई मेट्रो रेल्वे लाईन्स 2A आणि 7 देशाला समर्पित करतील. 2015 मध्ये पंतप्रधानांनी या मार्गांची पायाभरणी केली होती.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम