‘तो’ फोटो शेअर करत तेजश्रीनं दिली गुड न्यूज !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । २४ फेब्रुवारी २०२३ । राज्यातील प्रत्येक घराघरात गाजलेले होणार सून मी ह्या घरची मालिकेतील अभिनेत्री तेजश्री प्रधान. मालिकेनं तेजश्रीला नवी ओळख मिळवून दिली. होणार सून मी ह्या घरची मालिकेआधी तिनं अनेक मालिका आणि सिनेमात काम केलं मात्र या मालिकेमुळे तिला खऱ्या अर्थानं ओळख मिळाली.

15 हून अधिक वर्षांच्या अभिनय कारकिर्दीत तेजश्रीनं अनेक दिग्गज कलाकारांबरोबर काम केलं. तेजश्री लवकरच तिच्या नव्या प्रोजेक्टची घोषणा करणार आहे. मात्र त्याआधी तिनं एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यात तिनं 12 वर्षांपूर्वीच्या आठवणींना उजाळा दिलाय. मराठीतील प्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेत्याबरोबर तेजश्री पुन्हा मोठ्या पडद्यावर दिसणार आहे असं दिसतं आहे. 12 वर्षांपूर्वी तेजश्री कशी दिसत होती हे देखील या पोस्टमध्ये पाहायला मिळतंय. तेजश्रीनं डॉ. प्रकाश बाबा आमटे या सिनेमात डॉ. मंदाकिनी आमटे यांची भूमिका केली होती.

सिनेमातील तिची भूमिका फारच छोटी होती पण अनेकांच्या लक्षात पाहिली. तिनं तरूण वयातील मंदाकिनी आमटे साकारली होत्या. प्रकाश आमटे आणि मंदाकिनी आमटे यांच्या लग्नाचा सीन तेजश्रीवर चित्रीत करण्यात आलाय. याच सिनेमात ज्येष्ठ अभिनेते डॉ. मोहन आगाशे यांनी डॉ. बाबा आमटे यांची भूमिका साकारली होती.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम