राज्यात तणाव तर मुख्यमंत्री तीन दिवस बाहेर !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । ९ जून २०२३ ।  राज्यात गेल्या तीन दिवसापासून कोल्हापूरमध्ये पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात असतांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बुधवार रात्रीपासून नाॅट रिचेबल आहेत. तीन दिवस ते मुंबईबाहेर असून नेमके कुठे गेले याची माहिती मात्र गोपनीय ठेवण्यात आली आहे. दिल्लीहून परतल्यानंतर ते नाराज असल्याचे सांगितले जाते. सरकारची वर्षपूर्ती काही दिवसांवर असताना तसेच राज्यात दंगलीचे लोण पसरलेले असताना मुख्यमंत्री अचानक कुठे गेले, असा प्रश्न विचारला जात आहे.

दर बुधवारी राज्य मंत्रिमंडळाची बैठक होत असते. या आठवड्यात मात्र ती झाली नाही. बुधवारी दिवसभर मुंबईतच विविध कार्यक्रमांनी शिंदेंनी हजेरी लावली. बालाजी मंदिराची भूमिपूजन केले. नवी मुंबई विमानतळ कामाची पाहणी केली. ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी रात्री संभाजीनगरच्या काही नगरसेवकांचे पक्षप्रवेशही झाले. त्यानंतर मात्र शिंदे कुठे गेलेत याची माहिती गुप्त ठेवली आहे. सूत्रांच्या म्हणण्यानुसार, मुख्यमंत्री सातारा जिल्ह्यातील त्यांच्या दरे गावी जाणार होते. मात्र भाजपकडून त्यांना काश्मीरला जाण्याचा सल्ला देण्यात आला. त्यामुळे तीन दिवस कुटुंबासह शिंदे मुंबईत असणार नाहीत, अशी माहिती आहे.

आश्चर्य म्हणजे मुख्यमंत्री व गृहमंत्री यांचे दिवसभराचे कार्यक्रम माध्यम प्रतिनिधींना आदल्या रात्रीच दिले जातात. बुधवारपासून मात्र दोघांचेही कार्यक्रम कार्यालयांनी दिलेले नाहीत. याविषयी सीएम, डीसीएम कार्यालयाकडे चौकशी केला असता ‘कार्यक्रम नाहीत’ इतकेच सांगण्यात आले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सध्या नागपुरात स्वगृही आहेत.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम