राज्यात भीषण अपघात : पोलीस कर्मचारीसह एका वाहन चालकाचा मृत्यू !

बातमी शेअर करा...

बातमीदार | ३० जुलै २०२३ | राज्यात अपघाताची घटना नियमित सुरु झाली असून दोन काल बुलढाणा जिल्ह्यात दोन बसचा भीषण अपघाताची घटना ताजी असतांना आज यवतमाळमध्ये भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. या अपघातात कर्तव्य बजावत असणाऱ्या एका पोलिस कर्मचाऱ्यासह आणखी एका वाहन चालकाचा या अपघातात मृत्यू झाला आहे. एका ट्रक चालकाने पोलीस जिपला जोरदार धडक दिल्याने हा अपघात झाला आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

नागपूर तुळजापूर राष्ट्रीय मार्गावरील कोसदणी येथील घाटात हा भीषण अपघात मध्यरात्रीच्या सुमारास घडला आहे. महामार्ग पोलीस यावेळी एक ट्रक थांबवून त्याची कागदपत्रे तपासत होते. त्यावेळी मागून आलेल्या भरधाव आयशर ट्रकने हायवे पोलिसांच्या वाहनाला जोरदार धडक दिली आहे. हायवे पोलिसांच्या वाहनाला भरधाव आयशर ट्रकने जोरदार धडक दिल्याने हा अपघात झाला असून नागपूर तुळजापूर राष्ट्रीय मार्गावर वाहनांची तपासणी करणाऱ्या वाहनाला धडक दिली आहे. या अपघातामध्ये एक पोलीस कर्मचारी व आयशरचा चालक यांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर दोन पोलीस कर्मचारी देखील गंभीर जखमी झाले आहे. या अपघातानंतर बचाव पथकाने घटनास्थळी धाव घेतली आणि जखमींना रुग्णालयात दाखल केले. पोलिसांनी या घटनेची नोंद करत तपास सुरु केला आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम