सांगलीत घडल भयंकर : शाळेतील १७० मुलांना विषबाधा !
बातमीदार | २८ ऑगस्ट २०२३ | राज्याला हादरविणारी घटना सांगली जिल्ह्यातील एका तालुक्यात घडली आहे. आश्रमशाळेतील जवळपास 170 विद्यार्थ्यांना जेवणातून विषबाधा झाल्यामुळे अचानक प्रशासनाची मोठी धावपळ सुरु झाली. जत तालुक्यातील उमदी येथील समता आश्रम शाळेतील ही घटना असून. विद्यार्थ्यांवर तातडीने जवळच्या ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु केले असल्याची माहिती मिळाली आहे. हे प्रकरण अतिशय गंभीर असल्यामुळे प्रशासन खडबडून जागे झाले आहे. दोषींवर कडक कारवाई होणार आहे. सदर घटनेची संपूर्ण चौकशीकरून 24 तासाच्या आत अहवाल सादर करण्याच्या जिल्हाधिकाऱ्याच्या समाजकल्याण विभागाच्या सहायक आयुक्तांना सूचना दिल्या आहेत.
जत तालुक्यातील उमदी येथील एका आश्रमशाळेतील १७० विद्यार्थ्यांना जेवणातून विषबाधा झाल्याचा प्रकार घडला आहे. त्या शाळेचं नाव समता आश्रम असं आहे. हा प्रकार काल रात्री उशिरा घडला आहे. सुरुवातीला विद्यार्थ्यांना उलटी आणि मळमळ सुरु झाली. अनेक विद्यार्थ्यांना हा त्रास सुरु झाल्याने आश्रम शाळेतील कर्मचारी सुद्धा एकदम घाबरुन गेले होते. मुलांना माडग्याळ मधील प्राथमिक आरोग्य केंद्रात तातडीने दाखल करण्यात आले.
१७० विद्यार्थी ग्रामीण रुग्णालय माडग्याळ येथे आले होते. त्यापैकी ७९ पेशंट सध्या ग्रामीण रुग्णालय माडग्याळ येथे उपचार घेत आहेत, त्याचबरोबर त्यांची प्रकृती चांगली असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. बाकीचे विद्यार्थी रुग्ण मिरज मधील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहेत. ही घटना झाल्याचं समजल्यानंतर आरोग्य विभागाने तातडीने आरोग्य यंत्रणेने पाऊलं उचलल्याने इतक्या मोठया संख्येने विषबाधा झालेल्या विद्यार्थ्यांवर योग्य वेळेत उपचार करण्यात आले. विषबाधा झालेल्या विद्यार्थ्यांचे वय साधारण पाच वर्षापासून ते पंधरा वर्षापर्यंत आहे. सदर घटनेची संपूर्ण चौकशी करून 24 तासाच्या आत अहवाल सादर करण्याच्या जिल्हाधिकाऱ्याच्या समाजकल्याण विभागाच्या सहायक आयुक्तांना सूचना दिल्या आहेत.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम