रेल्वेचा भीषण अपघात : २३३ जणांचा मृत्यू तर शेकडो जखमी !
दै. बातमीदार । ३ जून २०२३ । देशाला हादरवून सोडणारी घटना शुक्रवारी संध्याकाळी ओडिशाच्या बालासोर येथे घडली आहे. याठिकाणी रेल्वे अपघातात 233 जणांचा मृत्यू झाला, तर 900 हून अधिक प्रवासी जखमी झाले. बालासोर येथील बहानागा बाजार स्थानकाजवळ सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. कोलकाता-चेन्नईकडे जाणारी कोरोमंडल एक्सप्रेस आणि यशवंतपूर-हावडा एक्सप्रेस बहानागाजवळ रुळावरून घसरली. यानंतर कोरोमंडल ट्रेल मालगाडीला धडकली.
पीटीआय या वृत्तसंस्थेनुसार, एका रेल्वे अधिकाऱ्याने सांगितले की, सर्वप्रथम यशवंतपूर-हावडा एक्सप्रेस रुळावरून घसरली. त्याचे काही डबे दुसऱ्या रुळावरून उलटले आणि दुसऱ्या बाजूने येणाऱ्या शालिमार-चेन्नई कोरोमंडल एक्सप्रेसला धडकले. यानंतर कोरोमंडल ट्रेनच्या काही बोगीही रुळावरून घसरल्या. या बोगी दुसऱ्या ट्रॅकवर असलेल्या मालगाडीला धडकल्या. काही बोगी मालगाडीच्या वर चढल्या.
ट्रेन क्रमांक १२८६४ बेंगळुरू – हावडा सुपरफास्ट एक्स्प्रेस 1 जून रोजी सकाळी 7:30 वाजता बेंगळुरूमधील यशवंतपूर स्थानकावरून निघाली. 2 जून रोजी रात्री 8 च्या सुमारास हावडा येथे पोहोचणार होती. नियोजित वेळेपेक्षा 3.30 तासांच्या विलंबाने 06:30 वाजता भद्रक येथे पोहोचली. पुढचे स्टेशन बालासोर होते, जिथे ट्रेन 4 तासांच्या विलंबाने 7:52 वाजता पोहोचणार होती. तर ट्रेन क्रमांक १२८४१ शालीमार-चेन्नई सेंट्रल कोरोमंडल एक्सप्रेस हावडाहून २ जून रोजी दुपारी ३.२० वाजता निघाली. 3 जून रोजी दुपारी 4:50 वाजता चेन्नई सेंट्रलला पोहोचते. ती संध्याकाळी ६.३७ वाजता बालासोरला वेळेवर पोहोचली. पुढचे स्टेशन भद्रक होते जिथे ट्रेन 7:40 ला पोहोचणार होती. पण, 7 वाजण्याच्या सुमारास बहानागा बाजार स्थानकाजवळ दोन्ही गाड्या समोरासमोर गेल्या, त्यावेळी हा अपघात झाला.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम