ठाकरे बंधू एकत्र येणार ? शरद पवार म्हणाले !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । ७ जुलै २०२३ ।  गेल्या काही दिवसात महाराष्ट्रात मोठ्या घडामोडी घडल्या असून राज्यात नवीन राजकीय समीकरणं निर्माण झाली आहे. तर राज्यात चालू असणाऱ्या राजकीय घडामोडींना स्थिरता मिळावी यासाठी ठाकरे बंधूंनी एकत्रित यावे अशी मागणी कार्यकर्ते करू लागले. तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एकत्र यावे म्हणून हालचाली सुरू झाल्याचे चित्र दिसून येत आहे.

दरम्यान या दोन्ही भावांनी एकत्रित यावे यासाठी मुंबई आणि ठाण्यात बॅनर्स लागले आहेत. विशेष म्हणजे काल (गुरुवारी) मनसेचे नेते आणि राज ठाकरेंचे विश्वासू अभिजीत पानसे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांकडे युतीचा प्रस्ताव घेऊन गेल्याची चर्चा सुरू झाली. तर ठाकरे बंधुंच्या एकत्र येण्यावर दिल्लीत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना प्रश्न विचारला असता. त्यावर पवारांनी स्मित हास्य करत तीनच शब्दात आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

अजित पवारांच्या मोठ्या निर्णयानंतर आता राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र यावे अशा चर्चा सुरू आहेत. याबाबत राज्यात होर्डिंगही लागले आहेत, शरद पवार यांनी यावर प्रतिक्रीया देताना, “चांगली गोष्ट आहे”, असं म्हंटलं आहे. तर पुढे बोलताना शरद पवार म्हणाले कि, ‘मला पूर्ण विश्वास आहे, २०२४ मध्ये महाराष्ट्रातील सत्ता बदलेल. आज जे सत्तेत आहेत त्यांना लोक सत्तेपासून दूर करतील. राज्यातील विरोधी पक्षांविरोधात ज्या प्रकारच्या गोष्टी केल्या त्याची किंमत त्यांना मोजावी लागेल,” असंही ते म्हणालेत.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम