ठाकरे गटाने दाखविले दादा भुसेंना पराभवाचे तोंड !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । २९ एप्रिल २०२३ ।  गेल्या काही दिवसांपूर्वीच उद्धव ठाकरे यांनी मालेगावात सभा घेतली होती. या सभेमध्ये ठाकरे यांनी दादा भुसे यांच्यावर जोरदार निशाणा साधला होता. भुसे यांनी गद्दारी केली, त्यांना निवडणुकांमधून धडा शिकवू असे उद्धव ठाकरे यांनी म्हंटले होते. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निकालातून ठाकरे यांनी भुसे यांना पहिला धक्का दिल्याचे मानले जात आहे.

कृषी उत्पन्न बाजार समितीचे निकाल आज जाहीर होतायेत. राज्यातील १४७ कृषी उत्पन्न बाजार समित्यांची निवडणूक शुक्रवारी पार पडली होती. यानंतर आज शनिवारी निकाल जाहीर करण्यात येत असून आतापर्यंत ७२ बाजार समित्यांचे निकाल जाहीर करण्यात आलेत. महाविकास आघाडीने या निकालांमध्ये सरशी घेतल्याचं चित्र सध्यातरी पाहायला मिळतंय. नाशिक-मालेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत देखील महाविकास आघाडीने जोरदार मुसंडी मारत मंत्री दादा भुसे यांना दणका दिलाय.
नाशिक-मालेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत गेल्या अनेक वर्षांपासून दादा भुसे यांच्या समर्थकांची सत्ता होती. मात्र ठाकरे गटाचे उपनेते अद्वय हिरे यांनी येथे कमाल करून दाखवली आहे. अद्वय हिरे यांच्या नेतृत्वाखालील पॅनलला ११ पैकी १० जागांवर विजय मिळाला आहे. मंत्री दादा भुसे यांच्या नेतृत्वाखालील पॅनलला केवळ एका जागेवर विजय मिळवता आल्याने भुसे यांच्यावर मोठी नामुष्की ओढवली आहे. निकालानंतर ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी ५० खोके एकदम ओके अशा घोषणा देत विजयोत्सव साजरा केला.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम