पवारांनी मार्ग काढावा ते सर्वांचे नेते आहेत ; शिंदे गट !
दै. बातमीदार । ५ फेब्रुवारी २०२३ । राज्यातील पुणे जिल्ह्यात सर्वच राजकीय नेत्यांनी गुडघ्याला निवडणुकीसाठी बाशिंग बांधले आहे. यावर शिंदे गटाच्या मंत्री केसरकर यांनी प्रतीक्रिया दिली आहे. एखाद्या मतदारसंघात लोकप्रतिनिधींचे निधन झालेले असल्यास त्याठिकाणी बिनविरोध निवडणूक व्हावी. ही महाराष्ट्राची परंपरा आहे. ही परंपरा खंडित होऊ नये, यासाठी शरद पवार नक्कीच मार्ग काढतील. ते सर्वांचे नेते आहेत. अशी इच्छा शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी शिर्डी येथे व्यक्त केली आहे.
कसबा आणि चिंचवड विधानसभा पोटनिवडणूक टाळण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील प्रयत्न सुरु केले आहे. निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी एकनाथ शिंदे यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, अजित पवार, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, नाना पटोले, जयंत पाटील यांना फोन केल्याची माहिती समोर आली आहे. आता यावर शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनीही आवाहन केले आहे.
प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना दीपक केसरकर म्हणाले, निवडणूक बिनविरोध झाली पाहिजे, ही महाराष्ट्राची परंपरा आहे. मधल्या काळात ही परंपरा खंडित झाली होती. तेव्हा शरद पवार यांनी पुढाकार घेऊन ती परंपरा पुन्हा सुरू केली आहे. त्यामुळे पुण्यातील कसबा पेठ आणि चिंचवड या दोन्ही जागांसाठी बिनविरोध निवडणूक करण्यासाठी शरद पवार नक्की पुढाकार घेतील.
यावेळी दीपक केसरकर म्हणाले, विधानपरिषदेच्या निकालावर कोणीही हुरळून जाण्याची गरज नाही. याचे मी स्वतः विश्लेषण मी शिक्षणमंत्री म्हणून केले आहे. जो प्रश्न जुन्या पेन्शनचा आहे, तो 2005 मध्ये जे शिक्षक आणि सेवक होते त्यांच्या संदर्भातील आहे. त्यावर लक्ष केंद्रीत करण्याचे वचन दिले असल्याचेही केसरकर यांनी म्हटले आहे. पुढे बोलताना दीपक केसरकर म्हणाले, मात्र अमरावतीत साडेचार हजार मते बाद झाली. त्यामुळे यातून अर्थ निघतो की, विधान परिषदेचे आमदार मंत्री होऊ नये यासाठी हा विरोध होता. मात्र कार्यकर्त्यांनी देखील विरोध करताना पक्षाच्या प्रतिमेला धक्का लागू नये याचा विचार करावा. त्याचप्रमाणे कोकण निवडणुकीचा उल्लेख कोणी करत नाहीये. मात्र त्याठिकाणी जनतेने बाळासाहेबांच्या विचारांना धक्का दिलेल्यांना पाडले.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम