
ठाकरे गटाला बसणार मोठा फटका ; शिंदे गटाच्या खासदाराने बजाविला व्हीप !
बातमीदार | ११ ऑगस्ट २०२३ | देशातील सर्वाच विरोधकांनी नरेंद्र मोदी सरकारविरोधात मांडलेला अविश्वास ठराव बारगळला. त्याचा मोदी सरकारवर कोणताही परिणाम झाला नसून त्याचा मोठा फटका शिवसेनेच्या ठाकरे गटाला बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मोदी सरकारविरोधातील अविश्वास ठरावावेळी शिवसेनेच्या शिंदे गटाने खासदारांना व्हीप बजावला होता. या व्हीपचे ठाकरे गटाच्या खासदारांनी उल्लंघन केले. त्यामुळे आता त्यांच्यावर कारवाई होणार असल्याची माहिती शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांनी दिली आहे.
विरोधकांनी अविश्वास ठराव मांडल्यानंतर आम्ही शिवसेनेच्या खासदारांना व्हीप बजावला होता. त्यात मतदानावेळी केंद्र सरकारच्या बाजूने मतदान करण्याची सूचना करण्यात आली होती. पण ठाकरे गटाचे 5 खासदार मतदानाला अनुपस्थित राहिले. आता त्यांच्यावर योग्य ती कारवाई केली जाईल.
या प्रकरणी सोमवारी वकिलांशी चर्चा करून संबंधित सदस्यांना नोटीस बजावण्यात येईल. तूर्त लोकसभेत शिवसेनेचा एकच गट मानला जातो. त्यामुळे ठाकरे गटाच्या सदस्यांनाही पक्षाच्या चिफ व्हीप भावना गवळी यांचा व्हीप लागू होतो, असे शेवाळे यांनी सांगितले. शिंदे गटाचे सर्व आमदार व खासदार भाजपच्या कमळाच्या चिन्हावर निवडणूक लढणार असल्याचा दावाही त्यांनी यावेळी फेटाळून लावला. अद्याप कोणत्याबही निवडणुकाही जाहीर झाल्या नाहीत. त्यावर त्यावर चर्चा होण्याचा प्रश्नच उद्धवत नाही, असे शेवाळे म्हणाले.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम