बँकेतील हे काम ३० जून आधी करा !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । ८ जून २०२३ ।  देशातील प्रत्येक व्यक्ती कुठल्याही बँकेचा ग्राहक असतो तो नेहमीच बँकेत जाण्यास टाळाटाळ करीत असतो पण आता बँक ग्राहकांसाठी एक मोठी बातमी समोर आली आहे. याबातमी नुसार जर तुम्ही तुमची काही वस्तू बँकेच्या लॉकरमध्ये ठेवत असाल किंवा ठेवण्याचा विचार करत असाल तर देशाची सर्वात मोठी बँक रिझर्व्ह बँकेने आता 31 डिसेंबर 2023 पर्यंत बँक लॉकर नियमांसाठी नवीन करार करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी बँकांना 30 जूनपर्यंत किमान 50 टक्के ग्राहकांशी करार करावा लागेल, त्यासाठी बँकांनी मेसेज पाठवण्यास सुरुवात केली आहे. हा नियम लागू झाल्यानंतर लॉकरबाबत बँकांना ग्राहकांशी मनमानी करता येणार नाही.

लॉकरमध्ये ठेवलेल्या वस्तूंचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यास त्याची जबाबदारी आता बँकेवर निश्चित करण्यात येणार आहे. त्याचबरोबर लॉकरच्या नियमांमध्ये झालेल्या बदलाची माहिती ग्राहकांना एसएमएस आणि इतर माध्यमातून बँकेला द्यावी लागेल.

SBI ने अलर्ट जारी केला
SBI च्या वतीने नवीन करारावर स्वाक्षरी करण्याबद्दल ग्राहकांना माहिती देणारे एक ट्विट करण्यात आले होते की बँकेने ग्राहकांच्या अधिकारांसह लॉकर करारामध्ये सुधारणा केली आहे. SBI च्या लॉकर सुविधेचा लाभ घेणाऱ्या सर्व ग्राहकांना विनंती आहे की त्यांनी त्यांच्या शाखेला भेट द्यावी आणि नवीन लॉकर करारावर स्वाक्षरी करावी.

RBI चे नवीन बँक लॉकर नियम
आरबीआयच्या नवीन नियमांनुसार बँकेच्या निष्काळजीपणामुळे लॉकरमध्ये ठेवलेल्या वस्तूचे काही नुकसान झाल्यास, बँकेला त्याची भरपाई द्यावी लागेल. ज्या जागेत सेफ डिपॉझिट व्हॉल्ट्स ठेवल्या जातात त्या जागेच्या सुरक्षेसाठी सर्व पावले उचलणे ही बँकांची जबाबदारी आहे. बँकेच्या कर्मचार्‍यांनी केलेल्या फसवणुकीमुळे नुकसान झाल्यास, बँकेचे दायित्व लॉकरच्या वार्षिक भाड्याच्या 100 पट पर्यंत असेल. भूकंप, पूर, वीज, वादळ इत्यादी नैसर्गिक आपत्तींमुळे, ग्राहकाच्या चुकीमुळे किंवा निष्काळजीपणामुळे लॉकरमधील वस्तूचे कोणतेही नुकसान झाल्यास बँक जबाबदार राहणार नाही.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम