विश्व संमेलनास ठाकरेंना आमंत्रण नाही ; केसरकरांनी केला खुलासा !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । ४ जानेवारी २०२३ जगभरातून लोकं येत आहेत आणि हे लोकं मातृभूमीवर प्रेम करणारे आहेत. हा कौटुंबिक सोहळा आहे. मुंबईही महाराष्ट्राचं हृदय आहे आणि तिथेही मराठी टिकली पाहिजे हा आमचा उद्देश आहे. पुढच्या काळात सर्व शिक्षण मातृभाषेत होणार आहे, अशी माहितीही केसरकरांनी दिली आहे. पण या कार्यक्रमाचे आदित्य ठाकरे यांना आमंत्रण नसल्याची चर्चा सुरु होती.

या कार्यक्रमाचे मला अद्याप या कार्यक्रमाचं आमंत्रण मिळालेलं नाही. तरीही मी माझ्या ऑफिसशी बोलतो. चेक करून सांगतो, असं आदित्य ठाकरे म्हणाले.  आदित्य ठाकरे यांच्या या विधानावर दीपक केसकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. प्रोटोकॉलप्रमाणे आम्ही सगळ्यांनाच या कार्यक्रमाचं निमंत्रित दिलं आहे. पण प्रत्येकाला वैयक्तिकरित्या निमंत्रण देणं शक्य होत नाही. पण उद्या सामनात जाहिरात छापून येणार आहे. त्यामुळे वेगळ्या निमंत्रणाची काय गरज आहे?, असं केसरकर म्हणालेत.

‘मराठी तितुका मेळवावा’ हे विश्व संमेलन घेण्या मागचं उद्देश्य हाच आहे की ज्यांनी मराठी भाषा आंतराष्ट्रीय पातळीवर टिकवली त्यांना एक व्यासपीठ उपलब्ध करून देता यावं. यामुळे मराठी भाषा आणि महाराष्ट्रात हित जोपासलं जाईल याची मला खात्री आहे, असं केसरकर म्हणालेत.

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत आणि या एका वर्षात आम्ही ते मिळवू, यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अनेक नवीन पुरावे मिळाले आहेत. त्यात हे सिद्ध होत आहे की मराठी भाषा ही अभिजात भाषा आहे आणि तो अधिकार मराठी भाषेला मिळवून देणं आमचा अधिकार-कर्तव्य आहे आणि आम्ही ते मिळवू, असं केसरकर म्हणालेत. अभिजात दर्जा मिळवणं ही वेगळी आणि टेक्नीकल बाब आहे. आम्हाला असे अनेक नवीन पुरावे मिळालेत. हे संम्मेलन घेण्याचा उद्देश आहे की ज्यांनी भाषा टीकवली त्यांना एकत्र आणणं, असंही ते म्हणालेत.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम