ठाकरेंनी वज्रमुठ सभेत सांगितला फडतूस शब्दाचा अर्थ !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । १७ एप्रिल २०२३ ।  राज्यात महाविकास आघाडीची वज्रमुठ सभा नागपूरमध्ये नुकतीच झाली यावेळी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी थेट भाजपवर हल्लाबोल केला. यावेळी उद्धव ठाकरे यांनी देखील मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल करीत असतांना त्यांनी फडणवीस हे फडतूस गृहमंत्री असे बोलल्याचा अर्थच सांगून दिल्याने राजकारण तापल आहे.

भाजप नेते उद्धव ठाकरे यांच्यावर तुटून पडले होते. फडतूस नही काडतूस हूँ मैं, झुकेंगा नही घुसेगा…उद्धव ठाकरेंच्या टीकेला देवेंद्र फडणवीसांचं प्रत्युत्तर दिले होते. मात्र, फडतूस बोलण्यामागचा उद्देश काय होता? हे उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीच्या वरज्रमुठ सभेत याबाबत जाहीर खुलासा केला आहे. फडतूस गृहमंत्र्यांना पदावर राहण्याचा अधिकार नाही, फडणवीसांना झेपत नसेल तर राजीनामा द्यावा अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली होती. तर, एकनाथ शिंदे मुख्यमंत्री की गुंडमंत्री? असा जोरदार घणाघातही उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांवर केला. यानंतर भाजप नेत्यांनी उद्धव ठाकरे च्यांच्यावर जोरदार टीका केली होती.

अवकाळी पावसामुळे शेतकरी संकटात आहे. अद्याप शेतकऱ्यांना मदत जाहीर झालेली नाही. हे सरकार फक्त सत्तेसाठी सत्तेत आले आहे. अशा सरकारला फडतूस नाही तर काय म्हणणार? सत्तेची नशा व्यसनासारखी असते; अनेकांना दारुचे व्यसन असते. दारुचे व्यन घरं उद्धवस्त करतं. त्याचप्रमाणे सत्तेची नशा देश उद्धवस्त करते. ज्या बाबासाहेबांनी देशाला घटना दिली संविधान दिले. संविधानाचे रक्षण केले पाहिजे.

बाबरी पाडायला तुमचे काका गेले होते का. अशा शब्दात उद्धव ठाकरेंनी नागपुरच्या वज्रमूठ सभेतून घणाघात केला. तुम्ही बाळासाहेबांचं योगदान नाकारता, शिवसेनाप्रमुखांचा अपमान करता का असा सवालही ठाकरेंनी विचारला.

शिंदे सरकार निवडणूक घ्यायला घाबरतं असा घणाघात राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांनी नागपुरच्या वज्रमूठ सभेतून केला जे आमदार ठाकरेंना सोडून गेले त्यांची नस दाबली असावी असं विधानही जयंत पाटलांनी केले.

भाजपचा बालेकिल्ला असलेल्या नागपुर मध्ये महाविकास आघडीची वज्रमूठ सभा पार पडली. या सभेसाठी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, विरोधी पक्षनेते अजित पवार, अनिल देशमुख, काँग्रेस नेते नाना पटोले, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आदी नेते उपस्थित होते. वज्रमुठ सभेपूर्वी नागपुरात उद्धव ठाकरेंच्या विरोधात भाजप युवा मोर्चानं निदर्शनं केली. वज्रमुठ सभेत उद्धव ठाकरे सावरकरांचा अवमान करणा-यांच्या मांडीला मांडी लावून बसणार असल्यानं, नागपूरच्या हेडगेवार चौकात हे आंदोलन करण्यात आले होते.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम