कमी पैश्यात करा थायलंड टूर !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । ८ जून २०२३ ।  जगातील अनेक प्रसिद्ध पर्यटन स्थळांसाठी अनेक प्रकारची टूर पॅकेजेस भारतीय रेल्वे आणते. आज आपण IRCTC इंडिपेंडन्स स्पेशल थ्रिलिंग थायलंड टूर विषयी जाणून घेऊया. या पॅकेजच्या नावावरूनच कळते की, स्वातंत्र्य दिनाच्या खास मुहूर्तासाठी हे पॅकेज सादर करण्यात आले आहे. तुम्ही 15 ऑगस्ट हा दिवस परदेशात साजरा करू शकता. हे पॅकेज 11 ऑगस्ट 2023 पासून सुरू होईल.

हे पॅकेज 6 दिवस आणि 5 रात्रीसाठी आहे. यामध्ये तुमचा प्रवास कोलकाता येथून सुरू होईल. फ्लाइटने, तुम्ही कोलकाताहून थायलंडमधील पट्टायाला पोहोचाल. या पॅकेजमध्ये तुम्हाला ब्रेकफास्ट,लंच आणि डिनरची सुविधा मिळेल. या पॅकेजमध्ये तुम्हाला पटायाच्या कोरल बीच, बँकॉकच्या सफारी वर्ल्डला भेट देण्याचीही संधी मिळेल.
या पॅकेजमध्ये तुम्हाला फ्लाइटमध्ये जाण्याची आणि येण्याची, हॉटेलमध्ये राहण्याची, जेवणाची, बस किंवा कॅबचीही सुविधा मिळेल. यासोबतच सर्व प्रवाशांना ट्रॅव्हल इन्शुरन्सचा लाभ मिळणार आहे. या पॅकेजमध्ये एकट्याने प्रवास करण्यासाठी तुम्हाला 51,100 रुपये, दोन व्यक्तींसाठी 43,800 रुपये आणि तीन लोकांसाठी 43,800 रुपये प्रति व्यक्ती भाडं द्यावं लागेल.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम