
वाघ नगरवासियांचे पालकमंत्री पाटील यांना साकडे !
दै. बातमीदार । १ फेब्रुवारी २०२३ । जळगाव ग्रामिण मतदार संघातील मौजे सावखेडा शिवार, वाघ नगरासह कोल्हे हिल पश्चिम परिसरामध्ये रहिवाश्यांनी आज पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची भेट घेवून त्यांना समस्येविषयी निवेदन देवून त्यांनी समस्या त्वरित सुटावे असे साकडेच घातले आहे.
निवेदनात म्हटले आहे कि, मागिल दहा वर्षा पासुन या परिसरात राहत असुन आजपर्यंत एकही पक्का रस्ता झालेला नाही. त्यामुळे खड्डे, बुळ व पावसाळ्यात चिखल भरपूर प्रमाणात होत असतो रस्त्यानी चालणे मुश्किल होत आहे यामुळे आमचे आरोग्य धोक्यात आलेले असुन पाठीचे मणके व कंबरेचे त्रास वाढलेले आहे. व रहदारीस अडचणी येत आहेत. तरी मा. मंत्री महोदय, आम्ही खाली सही करणारे रहीवासी नम्रपणे विनती. करतो की, या परिसरातील किमान मुख्य रस्ते १५ व १२ मिटर रुंदी असलेले रस्ते डॉ. बाबा साहेब आंबेडकर चौक ते श्रीराम चौक, गॅस गोडाऊन रोड अंदाजे २ किलो मिटर लांबी च्या रस्त्याचे सिमेंट कॉक्रिटीकरण करून मिळावे व आमच्या अडचणी सोडवाव्या या निवेदनावर देविदास भास्कर, नरेंद्र चव्हाण, बापू नेरे, सुभाष प्रजापती, संदीप क्षीरसागर, अनिल महाजन, हितेश पाटील, पंकज पाटील, संदीप यादव, अक्षय यादव, मनोज कलाल यांच्यसह परिसरातील नागरिकांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम