दै. बातमीदार । २५ मार्च २०२३ । राज्यात मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी गुढी पाडव्याच्या मेळाव्यात खळबळजनक माहिती समोर आणल्यानंतर माहीमजवळ समुद्रात अनधिकृत मजार उभारली जात असून दुसरा हाजी अली निर्माण करण्यात येत असल्याचा दावा करत राज यांनी व्हिडिओही दाखवला होता.
तसेच, सांगलीच्या कुपवाड येथेही अनधिकृत बांधकाम होत असल्याचं त्यांनी म्हटलं होतं. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे कारवाईची मागणीही केली. त्यानंतर, दुसऱ्याच दिवशीच प्रशासनाने तातडीने कारवाई केली. या कारवाईनंतर राज यांनी प्रथमच प्रतिक्रिया दिली आहे. तसेच, शिंदे-फडणवीस सरकारचे आभार मानत हिंदूंना आवाहनही केलं आहे.
राज ठाकरे यांनी सरकारला एका महिन्याचा अल्टिमेटम दिला होता. जर ही मजार हटवली नाही तर त्याच्या शेजारी गणपतीचं मंदिर उभं करण्याचा इशाराही त्यांनी जाहीरपणे दिला. मात्र, राज्य सरकारने अवघ्या १२ तासांत भविष्यात कुठलाही अनुचित प्रकार होऊ नये यासाठी कारवाईची मोहिम हाती घेतली. मुंबई प्रशासनाने तातडीने अनधिकृत बांधकामावर हातोडा मारला, त्याचसोबत जेसीबीने सर्व बेकायदेशीर बांधकाम हटवण्यात आले. तर, सांगलीतील त्या वादग्रस्त जागेवरही कारवाई करण्यात आली. त्यानंतर, मनसैनिकांनी राज ठाकरेंचा इम्पॅक्ट म्हणत सोशल मीडियावर बॅनरबाजीही केली. आता, स्वत: राज ठाकरे यांनी फोटो शेअर करत झालेल्या कारवाईचं स्वागत करत सरकारचे आभार मानले आहेत. तसेच, मोठी पोस्टही लिहिली आहे.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम