‘त्या’ तरुणीचे पाकिस्तानशी संबध ; खा.शेवाळेंनी पत्रकार परिषदेत केले आरोप
दै. बातमीदार । २५ डिसेंबर २०२२ । गेल्या काही दिवसापासून शिंदे गटाचे खा.शेवाळे हे वादात सापडले होते. त्यावर आज त्यांनी पत्रकार परिषद घेत ठाकरे गटाचे आदित्य ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले आहे.
खासदार राहुल शेवाळे म्हणाले, माझ्यावर आरोप करणाऱ्या तरुणीचे पाकिस्ताशी संबंध आहेत. कुख्यात गुंड दाऊद इब्राहीम व त्याच्या डी गँगशी संबंध आहे. माझे राजकीय करिअर उद्धवस्त करण्याचा हा प्रयत्न आहे. या तरुणीला युवासेनेचा पाठिंबा आहे. युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनीच या तरुणीला पाठिशी घातलं आहे. दिशा सालियन मृत्यू प्रकरणात मी संसदेत युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांचे नाव घेतल्याने ठाकरे गटाकडून आता जाणीवपूर्वक हे प्रकरण बाहेर काढले जात आहे. मात्र, हे काही छोटे प्रकरण नाही. हा एक मोठा आंतराष्ट्रीय कट आहे. त्यामुळे या प्रकरणाची एनआयएतर्फे चौकशी करावी.
खासदार राहुल शेवाळे, माझ्यावर ज्या तरुणीने आरोप केले, त्या तरुणीसोबत माझे कोणतेही संबंध नाही. तरुणीचे कुटुंबच गुन्हेगारी पार्श्वभूमीचे आहे. ही तरुणी जेव्हा दुबईत अडकली होती, तेव्हा मी या तरुणीला मदत केली, त्यानंतर तिची अपेक्षा वाढत गेली. तरुणाला पैसे देणे मी बंद केले, त्यानंतर खोटे फोटो दाखवून माझ्यावर बलात्काराचे खोटे आरोप तरुणीने केले. खासदार राहुल शेवाळे म्हणाले, माझ्यावर खोटे आरोप करण्यासाठी तरुणीने फेक अकाऊंट तायर करून बनावट व्हिडीओ तयार केले. माझ्या पत्नीला देखील या तरुणीने धमक्या दिल्या. तरुणीच्या सोशल मीडिया अकाऊंटला युवा सेनेच्या कित्येक पदाधिकाऱ्यांनी फॉलो केले आहे. यावेळी राहुल शेवाळेंनी फॉलोअर्सची ही यादीच पत्रकारांना दाखवली. तरुणीचे पाकिस्तानशीस कनेक्शन असून हे सर्व पाकिस्तानी एजंटमार्फत सुरू आहे. तसेच, तरुणीला दुबईमध्ये 86 दिवस अटक झाली होती. यावेळी तेथील पोलिस अधिकाऱ्यानेच या महिलेचे पाकिस्तान व डी गँगशी संबंध असल्याचे सांगितले होते. यावेळी राहुल शेवाळे यांनी दुबईतील अधिकाऱ्याची ऑडिओ रेकॉर्डिंगही ऐकवली. याशिवाय या प्रकरणाला आदित्य ठाकरेच पाठिशी घालत असल्याचा आरोप खासदार राहुल शेवाळे यांनी केला.
पत्रकार परिषदेत खासदार राहुल शेवाळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवरही गंभीर आरोप केले. खासदार राहुल शेवाळे म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेसचे संबंध दाऊद गॅंगसोबत आहेत. तेदेखील या तरुणीच्या पाठिशी आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसकडून मला अडकवण्याचा प्रयत्न होत आहे. शिवसेना सोडल्यामुळे माझी बदनामी सुरू आहे. गेले वर्षभर मी गप्प होतो. आता मात्र एनआयएने या प्रकरणाची चौकशी करून सत्य बाहेर आणावे.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम