६१ वर्षीय वृद्धाने दिवाळीच्या दिवशी कर्तव्यावर असलेल्या पोलिसांचा केला सन्मान

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । २६ ऑक्टोबर २०२२ । दिवाळीच्या दिवशी आपल्या घरापासून लांब राहून जनतेची सेवा करणारे पोलीस कर्मचारी हे मात्र सणासुदीमध्ये सुद्धा बंदोबस्तामध्ये राहत असतात, त्यांना कुठल्याही सणाच्या दिवशी परिवारासोबत राहणे हे कर्तव्यामुळे शक्य होत नसते. पण जळगावात एका ६१ वर्षीय वृद्धाने चक्क शहरातील प्रत्येक पोलीस स्थानकात दिवाळी जरा विशेष बनविली आहे.

शहरात सामाजिक कार्यात अग्रेसर असलेले सामाजिक कार्यकर्ते ६१ वयाचे वृद्ध मदन रामनाथ लाठी हे दरवर्षी शहरात दिवाळीच्या दिवशी रात्री 9 वाजेपासून प्रत्येक पोलीस स्थानकात जावून पोलीस बांधवाना मिठाई देत त्यांचा सत्कार करीत पोलीस कर्तव्य बजावीत असतांना त्यांना कुठे तरी सन्मान वाटेल, यासाठी हे सामाजिक कार्य नेहमी करीत असतात. या वयात लाठी करीत असलेले कार्य हे तरुणानाही लाजवेल असे कार्य त्यांच्या हातून घडत आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम