अल्पवयीन मुलीच्या विनयभंग गुन्ह्यातील फरार आरोपीस २४ तासाच्या आत अटक

बातमी शेअर करा...

भडगाव/प्रतिनिधी

तालुक्यातील दहाविचा पेपर द्यायला जात असणाऱ्या विद्यार्थीनाचा पाठलाग करून मी तुज्यावर प्रेम करतो तू का नकार देत आहे असे सांगत तिला लज्जा निर्माण होईल अश्या पद्धतीने कृत्य करत विनयभंग करणाऱ्या संशयित आरोपीला गुन्हा दाखल झाल्यानंतर २४ तासाच्या आत भडगाव पोलीस प्रशासनाकळून अटक करण्यात आली आहे.
याबाबत माहिती अशी की, भडगाव तालुक्यातील ग्रामीण भागातील १६ वर्षीय अल्पवयीन मुलगी १ मार्च ते १५ मार्च दरम्यान दहावीचा पेपर देण्यासाठी जात असतांना योगेश अशोक पाटील हा तिचा पाठलाग करत होता. दरम्यान बुधवार १५ मार्च रोजी दुपारच्या सुमारास पिडीत मुलीचा त्याने रस्ता आडविला. त्यानंतर ‘मी तुझ्यावर प्रेम करतो.. तु का नाही म्हणत आहे’.. असे बोलून तिचा हात पकडला. यानंतर ‘तु मला ध्यानात ठेवू मी तुला बघुन घेईन’ असा दम दिला. आणि तिचा विनयभंग केला. प्रकार घडल्यानंतर पिडीत मुलीने भडगाव पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार देली होती. पिडीत मुलीच्या तक्रारीवरून संशयित आरोपी योगेश अशोक पाटील यांच्य विरोधात भडगाव पोलीस ठाण्यात गुरन ७४/२०२३ भादवि कलम ३५४, ३५४ (ड), सह बालकांचे लैगिक गुन्ह्यांपासून संरक्षण अधिनियम २०१२ चे कलम ११,१२ अन्वये दिनांक १५/०३/२०२३ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्ह्यातील आरोपी हा गुन्हा घडल्यापासुन फरार होता. पोलीस निरिक्षक राजेंद्र पाटील यांचे सह पोकॉ विलास पाटील, पोकॉ स्वप्निल चव्हाण यांनी गोपनिय माहितीच्या आधारे मोठया शिताफिने २४ तासाच्या आत सदर आरोपीस पारेश्वर मंदिर पिंपरखेड येथुन अटक केली.

सदर गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरिक्षक श्री. चंद्रसेन बा. पालकर हे करित आहेत.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम