अभिनेत्रीने दिली गुड न्यूज पण चाहत्यांनी केले ट्रोल !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । २३ जुलै २०२३ । सध्या अनेक छोट्या छोट्या गोष्टी लागलीच व्हायरल होवून बातमी होत असते. अशीच एका बॉलीवूड अभिनेत्रीची बातमी झाली असून तिने गुड न्यूज दिली असून सध्या ती सोशल मिडीयावर व्हायरल झाली आहे.

बॉलीवूड अभिनेत्री स्वरा भास्कर लवकरच आई होणार आहे. स्वरा भास्कर लग्नानंतर अवघ्या काही महिन्यानंतरच गरोदर असल्याची माहिती समोर आल्यानंतर तिला ट्रोल करण्यात आले. मात्र अनेकदा ती ट्रोल करणाऱ्यांना सडेतोड उत्तर देताना दिसते. नुकतेच स्वराने तिचा बेबी बंप दाखवतानाचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. जो व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये स्वरा भास्करने काळ्या आणि निळ्या रंगाचा ड्रेस परिधान केला आहे. ती यात मेकअपशिवाय दिसत आहे. गरोदरपणाचे दिवस ती एंजॉय करत असल्याचे दिसत आहे. या व्हिडिओमध्ये ती खूप आनंदी असल्याचेही पाहायला मिळत आहे. हा व्हिडिओ शेअर करत तिने कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘आजकाल मॅटर्निटी वेअरचा वर्षाव होत आहे. नवीन आणि अतिशय आरामदायक वॉर्डरोबसाठी धन्यवाद..’

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम