अभिनेत्रीने केला रिक्षाने प्रवास ; कारण वाचून व्हाल थक्क !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । २६ मे २०२३ ।  नेहमीच सोशल मिडीयावर आपल्या वेगवेगळ्या भूमिकेत दिसणार प्रसिद्ध अभिनेत्री सारा अली खान सध्या ‘जरा हटके जरा बचके’ या चित्रपटामुळे चर्चेत आली आहे. सध्या ती या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. नुकतेच तिने एका कार्यक्रमाला हजेरी लावली होती. मात्र गाडी न आल्याने तिने थेट रिक्षाने प्रवास केला. तिचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. मात्र यावरुन तिला ट्रोलही करण्यात आले आहे.

काही दिवसांपुर्वी सारा अली खान आणि विकी कौशल राजस्थानला प्रमोशन निमित्त गेले होते. त्यानंतर मुंबईत एका कार्यक्रमाला हजेरी लावल्यानंतर घरी परतत असताना तिची गाडी आली नव्हती. त्यामुळे तिने वेळ वाया न घालवता, थेट रिक्षाने प्रवास केला. यावेळी ती म्हणते की, ‘माझी गाडी आली नाही म्हणून मी रिक्षाने प्रवास केला. यापुर्वी मी अनेकदा रिक्षाने प्रवास केला आहे.’ सारा अली खानचा हा व्हिडीओ पाहून यूजर्स ऑटो ड्रायव्हरचे पैसे न दिल्याचे म्हणत आहे. यावर एक यूजर कमेंट करत म्हणतो, “रिक्षा ड्रायव्हरचे पैसे कोण देणार?… आधी ते पैसे दे” तर दुसरा युजर म्हणतो, “ड्रायव्हरला ना पैसे दिलेस ना त्याला फोटो काढून दिला.” तर काहींंनी पब्लिसिटी स्टंट करत असल्याचे म्हणत तिला ट्रोल केले आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम