लग्नात एन्जॉय करताना दिसली ‘हि’ अभिनेत्री

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । ४ नोव्हेबर २०२२ हिंदी मालिकांपासून ते दाक्षिणात्य सिनेमांपर्यंत सगळीकडेच आपल्या अभिनयाची चमक दाखवणारी हंसिका लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. तिने ‘शका लका बूम बूम’ सारख्या मालिकांमधून बालकलाकार म्हणून आपलं करिअर सुरू करणारी हंसिका मोटवानी सध्या तिच्या लग्नामुळे भलतीच चर्चेत आहे.

या दरम्यान आता हंसिकाच्या होणाऱ्या नवऱ्याच्या पहिल्या लग्नाचा व्हिडीओ जोरदार सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे,ज्यामध्ये दस्तुरखुद्द हंसिका आपल्या होणाऱ्या नवऱ्याच्या पहिल्या लग्नात एन्जॉय करताना दिसत आहे. हंसिका मोटवानीला तिचा होणारा नवरा व्यावसायिक सोहेल खतुरियाने पॅरिसमध्ये प्रपोज केलं होतं. दोघांच्या साखरपुड्याचे फोटो जोरदार व्हायरल झाले होते. दोघं आता लवकरच लग्न देखील करणार आहेत. पण आता यादरम्यान सोहेलच्या पहिल्या लग्नाचा व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत आला आहे,ज्यात हंसिका कितीतरी वेळा त्याच्या कुटुंबासोबत,मित्र-परिवारासोबत मजामस्ती करताना दिसत आहे आणि लग्नदेखील एन्जॉय करत आहे.सोहेलच्या पहिल्या लग्नाचा व्हिडीओ सोशल मीडियावर आहे,ज्यात लग्नाच्या आधीचे सगळे सोहळे दिसतायत आणि हंसिका मोटवानी देखील त्यात धम्माल करताना दिसत आहे. रिपोर्ट्सनुसार हंसिकाचा होणारा नवरा सोहेल खतुरियाने २०१६ मध्ये रिंकी नावाच्या मुलीसोबत गोव्यात डेस्टिनेशन वेडिंग केलं होतं. या लग्नाला कुटुंबिय आणि मित्रपरिवार उपस्थित होता,ज्यात हंसिका देखील होती.

हा व्हिडीओ पाहून लोक आता हैराण झाले आहेत की आपल्या होणाऱ्या नवऱ्याच्या पहिल्या लग्नात हंसिकानं किती मज्जा केली होती. इतकंच नाही तर कलीरा विधीच्या वेळेस नवरीच्या हातातून कलीऱ्याचा तुकडा पडताना दिसतो,जो नेमका हंसिकाच्या पाठीच जाऊन पडतो.

रिंकी बजाजसोबत पहिलं लग्न करणाऱ्या सोहेलचं हंसिकासोबत हे दुसरं लग्न आहे. माहितीसाठी सांगतो की सोहेल खतारिया मुंबईतील एक व्यावसायिक आहे. तो टेक्सटाईल बिझनेसमध्ये आहे,त्याची कंपनी १९८५ पासून गारमेंट्सच्या एक्सपोर्ट बिझनेसमध्ये आहे. पॅरिसमध्ये आयफेल टॉवरसमोर सोहेलनं हंसिकाला प्रपोज केलं होतं आणि ते फोटो त्याने सोशल मीडियावर देखील शेअर केले होते. बोललं जात आहे की हंसिका आणि सोहेल ४ डिसेंबरला जयपुरमध्ये लग्नबंधनात अडकणार आहेत. लग्न रॉयल अंदाजात होणार असल्याची चर्चा केव्हापासूनच सुरू झाली आहे. राजस्थानमधील ४५० वर्ष जुन्या मुंडोता फोर्ट अॅन्ड पॅलेसमध्ये हंसिका सोहेलसोबत लग्नगाठ बांधणार आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम