कुत्र्याच्या मांसाची विक्रीवरील बंदी उठविली !
दै. बातमीदार । ७ जून २०२३ । देशातील अनेक भागातील लोकांची वेगवेगळी परंपरा व वेगळा आहार असतो, त्यामुळे प्रत्येक ठिकाणी आहार काय असतो हे आपल्याला लवकर लक्षात येत नसते. पण सध्या देशात गुवाहाटी उच्च न्यायालयाने नागालँडमधील कुत्र्याच्या मांसाच्या विक्रीवरील बंदी उठवण्याचा निर्णय घेतला आहे. नागालँड सरकारने कुत्र्याच्या मांसाच्या व्यावसायिक आयात आणि विक्रीवर बंदी घातली होती. उच्च न्यायालयाच्या कोहिमा खंडपीठाने हा आदेश रद्द केला आहे.
नागालँडमध्ये कुत्र्याच्या मांसाची आणि हॉटेलमध्ये त्यांच्या खाद्यपदार्थांची विक्री यांवर बंदी घालण्यात आली आहे. त्यानुसार, कोहिमा नगर परिषदेअंतर्गत येणाऱ्या तीन परवानाधारक मांसविक्रेत्यांना जुलै 2020मध्ये कुत्र्याचं मांस विकण्यास प्रतिबंध घालण्यात आला होता. त्याविरोधात त्यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. उच्च न्यायालयाने सुनावणी करताना नागालँड सरकारच्या या निर्णयाला रद्द करण्याचे आदेश दिले आहेत.
या प्रकरणी सुनावणी करताना कोहिमा खंडपीठाच्या न्यायमर्ती मार्ली पवैंकुंग म्हणाले की, मांसविक्रेत्यांच्या उपजीविकेचा प्रश्न असेल तर ते अद्यापही उपजीविकेसाठी सक्षम आहेत. जरीही 2011च्या खाद्य सुरक्षा आणि मानक अधिनियमांतर्गत कुत्र्याचं मांस हे मानवी भक्षणायोग्य मांसाच्या व्याख्येत येत नसलं, तरीही नागालँडमध्ये या मांसाचे पदार्थ खाल्ले जातात, असं म्हणत न्यायालयाने नागालँड सरकारचा मांसविक्रीच्या बंदीचा निर्णय रद्द करण्याचे आदेश दिले.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम