‘जवान’ची पहिल्याच दिवशी मोठी कमाई पण अडकणार वादात !
बातमीदार | ८ सप्टेंबर २०२३ | बॉलीवूडचा किंग खान म्हणून प्रसिद्ध असलेल्या शाहरुखचा नुकताच दहीहंडीच्या मुहूर्तांवर म्हणजे 7 सप्टेंबर रोजी प्रदर्शित झाला. गेल्या अनेक दिवसांपासून चाहते देखील ‘जवान’ सिनेमाच्या प्रतीक्षेत होते. पहिल्याच दिवशी सिनेमाने तब्बल 75 कोटी रुपयांचा गल्ला जमा केला आहे. त्यामुळे येत्या दिवसांमध्ये सिनेमा किती कोटी रुपयांची कमाई करेल, अशी चर्चा सुरु असताना ‘जवान’ सिनेमा वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. ज्यामुळे सर्वत्र वादग्रस्त परिस्थीती निर्माण झाली आहे. ‘जवान’ सिनेमावर अनेक गंभीर आरोप करण्यात आले आहेत. ज्यामुळे सिनेमा वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. अशात सिनेमात पुढे किती कमाई करेल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
बॉलिवूडमध्ये सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर सिनेमावर आरोप करणं नवीन नाही. याआधी देखील अनेक सिनेमावर आरोप करण्यात आले. आता शाहरुख खान याच्या ‘जवान’ सिनेमावर देखील गंभीर आरोप करण्यात आले आहेत. म्हणून शाहरुख खान आणि ‘जवान’ सिनेमा वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त ‘जवान’ सिनेमाची चर्चा रंगत आहे.
किंग खान याच्या ‘जवान’ सिनेमावर चोरीचे आरोप करण्यात आले आहेत. दिग्दर्शक एटली द्वारा दिग्दर्शित ‘जवान’ सिनेमावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. एकीकडे ‘जवान’ सिनेमा बॉक्स ऑफिसवर तगडी कमाई करत आहे, तर दुसरीकडे ट्विटरवर ‘जवान’ सिनेमा एका तामिळ सिनेमाची कॉपी असल्याचे आरोप करण्यात आलं आहेत. सोशल मीडियावर यावरुन सध्या वाद रंगत आहेत. ‘जवान’ सिनेमा तमिळ सिनेमा थाई नायडू सिनेमाची कॉपी असल्याची चर्चा सोशल मीडियावर जोर धरत आहे. ‘थाई नायडू’ सिनेमा १९८९ साली प्रदर्शित झाला होता. ‘थाई नायडू’ सिनेमाचं दिग्दर्शन सत्यराज यांनी केलं होतं. आता ‘थाई नायडू’ आणि ‘जवान’ सिनेमातील वाद सोशल मीडियावर टोकावर पोहोचला आहे. पण सुरु असलेल्या वादावर ‘जवान’ सिनेमाच्या टीमकडून कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम