बारावीच्या परीक्षेचे शुल्क शिक्षण मंडळाने वाढवले !

बातमी शेअर करा...

बातमीदार | २७ मे २०२३ |  राज्यात नुकतेच बारावीचा निकाल लागला आहे. यात राज्यातील मुलीनी बाजी मारली असून आता राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने उच्च माध्यमिकचे म्हणजेच बारावीच्या परीक्षेचे शुल्क वाढविले आहे. जुलै २०२३च्या पुरवणी परीक्षेपासून शुल्कात दहा टक्के वाढ करण्यात आली आहे. विज्ञान, कला, वाणिज्य, एमसीव्हीसी, द्विलक्षी शाखेतील नियमित व खाजगी विद्यार्यांसाठी ४४० रूपये परीक्षा शुल्क राहणार. त्याखेरीज प्रशासकीय शुल्क २०, गुणपत्रिका शुल्क २०, प्रात्यक्षिक परीक्षा प्रती विषय १५ रूपये तर एमसीव्हीसीसाठी ३० तसेच माहिती तंत्रज्ञान शाखेच्या प्रत्येक विषयासाठी २०० रूपये शुल्क आकारल्या जाणार आहे.

पुर्नपरीक्षार्थी विद्यार्थ्यांसाठी हेच शुल्क लागू होणार. श्रेणी सुधारण्यासाठी अ श्रेणी सुधार योजनेत सहभागी नियमित तसेच पुनर्परिक्षार्थी यांना ८८० रूपये पडतील. ब श्रेणीतील खाजगी विद्यार्थ्यांना ८८० रूपये लागू होणार. तसेच प्रशासकीय व गुणपत्रिका शुल्क प्रत्येकी २० रूपये. प्रात्यक्षिक परीक्षा १५ रूपये व माहिती तंत्रज्ञान २०० रूपये पडणार आहे. इतर तुरळक विषयांसाठी अ श्रेणीस १२० तर ब श्रेणीस ४८० रूपये पडणार. प्रशासकीय व गुणपत्रिका शुल्क २० रूपये व प्रात्यक्षिक परीक्षा प्रती विषय १५ रूपये पडणार.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम