महागाईचे ओझे वाढणार ; १ एप्रीलपासून या वस्तू होणार महाग !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । ३० मार्च २०२३ ।  यंदाचे आर्थिक वर्ष आज संपत आहे. तरी अनेक वास्तूमध्ये उद्यापासून दरात वाढ होणार असल्याने नागरिकांनी आजच अनेक वस्तू खरेदी करून आपले पैसे वाचविण्याची एक संधी तुम्हाला आज आहे. कारण १ एप्रीलपासून आता वस्तूचे दरवाढ होणार आहे. सर्वसामान्य नागरिकांना याचा फटका बसणार आहे. सर्वसामान्य नागरिकांवरील महागाईचे ओझे वाढेल.

नव्या आर्थिक वर्षाच्या सुरुवातीबरोबरच, अनेक गोष्टी महाग होतील. याचा परिणाम थेट सर्वसामान्यांच्या खिशावर पडेल. खरे तर, 1 फेब्रुवारीला सादर झालेल्या अर्थसंकल्पात अनेक गोष्टींवर टॅक्‍स वाढविण्यात आल्याने त्या वस्तूंच्या किंमतीत मोठी वाढ होणार आहे. 1 एप्रिल 2023 पासून याची अंमलबजावणी होईल.

काय स्वस्त होणार – 1 एप्रिल 2023 पासून अनेक गोष्टींवरील कस्‍टम ड्यूटी 5 टक्क्यांपर्यंत कमी करून 2.5 टक्के करण्यात आली आहे. यामुळे संबंधित वस्तूंच्या किंमतीत घसरण होईल. या वस्तूंमध्ये मोबाईल फोन, कॅमेरा, एलईडी टीव्ही, बायोगॅसशी संबंधित वस्तू, इलेक्ट्रिक कार, खेळणी, हिट कॉईल, डायमंड ज्‍वेलरी, बायोगॅसशी संबंधित काही गोष्टी, सायक‍ल आदी गोष्टींचा समावेश आहे.

याशिवाय, 1 एप्रिलपासून सोने-चांदी आणि यांपासून तयार होणाऱ्या ज्‍वैलरी, प्लॅटिनम, इंपोर्टेड दरवाजे, किचनमधील चिमनी, परदेशी खेळणी, सिगारेट आणि एक्‍स-रे मशीन या वस्तू स्वस्त होतील. या वस्तूंवरील टॅक्स कमी करण्याची घोषणा 1 फेब्रुवारीला सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पात करण्यात आली आहे.

एलपीजी स‍िलिंडर – खरे तर, प्रत्येक महिन्याच्या 1 तारखेला एलपीजी सिलिंडरच्या किमतीची समीक्षा केली जाते अथवा आढावा घेतला जातो. या 1 एप्रिलला पेट्रोलियम कंपन्या किंमती वाढवू शकतात. यापूर्वी 1 मार्चला कंपन्यांनी सिलिंडरच्या दरात 50 रुपयांची वाढ केली होती. त्यानंतर दिल्लीत सिलिंडरची किंमत 1103 रुपये झाली. यापूर्वी ते 1053 रुपयांना उपलब्ध होत होते. यावेळीही तेल कंपन्या सिलिंडरचे दर वाढवण्याची शक्यता आहे.

कारच्या किंमतीही वाढणार- जर आपण कार घेण्याचा विचार करत असाल तर, 1 एप्रिलपासून तीही महाग होणार आहे. टाटा मोटर्स, हिरो मोटो कॉर्प आणि मारुती या कंपन्यांनी वाहनांच्या किमती वाढवण्याची घोषणा केली आहे. नवीन दर 1 एप्रिलपासून लागू होतील. कंपन्यांकडून मॉडेलनुसार, किंमत वाढविली जाणार आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम