बसला कंटेनरची जोरदार धडक ; कंडक्टरचा मृत्यू !

बातमी शेअर करा...

बातमीदार | ३० सप्टेंबर २०२३

राज्यातील अनेक महामार्गावर अपघाताची मालिका सुरु असतांना मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर प्रवासी उतरण्यासाठी थांबलेल्या बसला पाठीमागून येणाऱ्या कंटेनरने जोरदार धडक दिली. या अपघातात बस कंडक्टरचा जागीच मृत्यू झाला. ही दुर्देवी घटना शुक्रवारी २९ सप्टेंबर रात्रीच्या सुमारास घडली. शिवराज माळी असं मृत कंडक्टरचं नाव आहे.सुदैवाने या अपघातात बसमधील कोणत्याही प्रवाशाला गंभीर दुखापत झाली नाही. याप्रकरणी पोलिसांनी कंटेनर चालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अपघातग्रस्त बस ठाणे डेपोची होती. ती उगमरग्याहून ठाण्याला येत होती.मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील एका थांब्याजवळ प्रवाशांना उतरण्यासाठी बस थांबली असता, पाठीमागून येणाऱ्या कंटेनरने बसला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की यामध्ये बस कंडक्टर शिवराज माळी यांचा जागीच मृत्यू झाला. शिवराज हे उस्मानाबाद जिल्ह्यातील रहिवाशी होती.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम