प्रसिद्ध अभिनेत्याच्या पत्नीचे मृत्यूचे कारण आले समोर !

बातमी शेअर करा...

बातमीदार | ७ ऑगस्ट २०२३ |  गेल्या काही महिन्यापासून चित्रपट विश्वात अनेक धक्कादायक घटना उघडकीस येवू लागल्या आहेत. ज्यामुळे सर्वत्र खळबळ माजली आहे. अनेक दिग्गज व्यक्तींच्या निधनानंतर दाक्षिणात्य सिनेविश्वातील प्रसिद्ध अभिनेता विजय राघवेंद्र याची पत्नी स्पंदना राघवेंद्र हिचं निधन झालं आहे.

स्पंदना राघवेंद्र हिच्या निधनानंतर अभिनेत्याच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. स्पंदना राघवेंद्र हिचं निधन हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याची माहिती समोर येत आहे. मीडिया रिपोर्टनुसार, स्पंदना राघवेंद्र हिला ब्लड प्रेशरचा त्रास होता. म्हणून अभिनेत्याच्या पत्नीला हृदयविकाराचा झटका आला आणि स्पंदना राघवेंद्र हिचं निधन झालं… अशी माहिती समोर येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, विजय राघवेंद्र याच्या पत्नीला लो ब्लड प्रेशरचा त्रास होता. त्यामुळे स्पंदना राघवेंद्र हिला हृदयविकाराचा झटका आला. स्पंदना राघवेंद्र हिचं पार्थिव उद्या बेंगळुरूला पोहोचण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. जेथे अभिनेत्याच्या पत्नी अंत्यसंस्कार होतील… धक्कादायक गोष्ट म्हणजे, कुटुंबासोबत सुट्ट्यांचा आनंद घेत असताना स्पंदना राघवेंद्र हिचं निधन झालं आहे.

बँकॉकमध्ये स्पंदना राघवेंद्र हिचं निधन झाल्याची माहिती समोर येत आहे. परदेशात निधन झाल्यामुळे भारतात पार्थिव येण्यास वेळ लागत आहे. मंगळवारी अभिनेत्याच्या पत्नीचं पार्थिव बेंगळुरूला पोहोचेल असं सांगण्यात येत आहे. स्पंदना हिच्या आकस्मिक निधनामुळे अभिनेत्रीच्या कुटुंबावर शोककळा पसरली आहे. अभिनेता विजय राघवेंद्र याची पत्नी स्पंदना हिने देखील अनेक सिनेमांमध्ये काम केलं होतं. तिने सिनेमांमध्ये पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेला देखील न्याय दिला होता. तिने ‘अपूर्वा’ सिनेमात भूमिका बजावली होती. ऑगस्ट महिन्यात राघवेंद्र आणि स्पंदना लग्नाचा १६ वा वाढदिवस सारजा करणार होते. २००७ साली मोठ्या थाटात राघवेंद्र आणि स्पंदन यांनी लग्न केलं. दोघांना एक मुलगा देखील आहे. त्यांच्या मुलाचं नाव शौर्य असं आहे. स्पंदना हिच्या निधनानंतर सर्वत्र खळबळ माजली आहे. स्पंदना अभिनेत्री असल्यामुळे अनेक जण सोशल मीडियाच्या माध्यमातून श्रद्धांजली वाहत आहेत. स्पंदना हिचं परदेशात निधन झाल्यामुळे काही प्रक्रिया पूर्ण झल्यानंतर तिचं मृतदेह भारतात येईल..

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम