केद्र सरकार घेणार मोठा निर्णय : कर्मचाऱ्यांना मिळणार भेट !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । २५ फेब्रुवारी २०२३ । केद्र सरकारच्या 1 मार्च रोजी होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीत कर्मचाऱ्यांना मोठी भेट मिळू शकते. या बैठकीत जानेवारी 2023 च्या वाढीव DA वाढीला मान्यता दिली जाऊ शकते. यासोबतच कर्मचाऱ्यांच्या खात्यात 2 महिन्यांच्या थकबाकीचे (डीए एरिअर्स) पैसेही येऊ शकतात.

त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या पगारात दरमहा 10,500 रुपयांची वाढ होऊ शकते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, जानेवारी 2023 मध्ये सरकार कर्मचाऱ्यांना 42 टक्के दराने डीए देऊ शकते. कॅबिनेट बैठकीत सरकार वाढीव डीए जाहीर करू शकते. AICPI डेटावरून मिळालेल्या माहितीनुसार, यावेळी महागाई भत्ता 4 टक्क्यांनी वाढू शकतो. 52 लाख केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांना वाढीव डीएचा लाभ मिळणार आहे. सध्या कर्मचाऱ्यांना ३८ टक्के दराने डीए मिळत आहे. यावेळी सरकारने 4 टक्के वाढ केल्यास कर्मचाऱ्यांना 42 टक्के दराने महागाई भत्ता मिळेल.

सातव्या वेतन आयोगाअंतर्गत कर्मचार्‍यांच्या मूळ पगारावर डीएची गणना केली जाते. जर कोणत्याही कर्मचाऱ्याचा मूळ पगार 25,000 रुपये असेल तर त्याच्या पगारात 42% DA नुसार दरमहा 10500 रुपयांची वाढ होईल. दुसरीकडे, जर एखाद्या कर्मचाऱ्याचा मूळ पगार 18000 रुपये असेल तर त्याच्या पगारात दरमहा 7560 रुपयांची वाढ होईल. कर्मचार्‍यांच्या डीएमध्ये 4 टक्के वाढ झाल्यास, महागाई भत्ता 42 टक्क्यांपर्यंत पोहोचेल. जुलै 2022 मध्येही सरकारने कर्मचाऱ्यांच्या डीएमध्ये 4 टक्क्यांनी वाढ केली होती. लाखो केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांना डीए आणि डीआर वाढीचा फायदा होईल.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम