मुख्यमंत्र्यांनी दिले संकेत ; सुशांतसिंह आत्महत्येची फाइल पुन्हा ओपन !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । २२ डिसेंबर २०२२ । हिवाळी अधिवेशनात आज राज्यातील बहुचर्चित सुशांतसिंह राजपूतच्या आत्महत्येची फाइल पुन्हा ओपन होण्याची शक्यताय. विशेष म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज प्रसारमाध्यमांशी बोलताना तसे संकेत दिलेत. एकीकडे विरोधकांनी एकनाथ शिंदे यांच्यावर भूखंड घोटाळ्याचे आरोप केलेत. त्यामुळे शिंदे यांना बॅकफूटरव यावे लागले. त्यानंतर आता शिंदे गट आणि भाजप सुशांतसिंह आत्महत्याप्रकरणावरून आक्रमक होतोय. विधानसभेतही याप्रकरणी भाजप आणि शिंदे गटाच्या आमदारांनी गदारोळ केला.

नागपूर हिवाळी अधिवेशनात सुशांतसिंह आत्महत्या प्रकरणावरून राजकीय वातावरण गरम झालेय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर भूखंड घोटाळ्याचा आरोप झाला. त्यानंतर शिंदे गट आणि भाजपने पुन्हा एकदा सुशांतसिंह आत्महत्याप्रकरण उचलून धरले आहे. याप्रकरणी खासदार राहुल शेवाळे यांनी लोकसभेत मुद्दा उपस्थित केला. सुशांतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीच्या मोबाइलवर ‘एयू’ नावाने अनेक कॉल आले. ते नेमके कोणाचे होते? अनन्या उधास यांचे की, आदित्य ठाकरे यांचे? बिहार पोलिसांनी तर ‘एयू’ म्हणजे आदित्य उद्धव ठाकरे असल्याचे शेवाळे म्हणाले. हे ‘एयू’ कोण, हे समोर यावे अशी मागणी त्यांनी केलीय.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही याप्रकरणी गुरुवारी नागपूर येथे पत्रकारांशी बोलताना सुशांतसिंह प्रकरणाची फाइल पुन्हा ओपन करण्याचे संकेत दिलेत. प्रसारमाध्यमांशी बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले की, अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणाबाबत जनतेच्या मनात संभ्रम होता. तो संभ्रम अजूनही आहे. शिंदे यांच्या या वक्तव्यामुळे सुशांतसिंह प्रकरणाची फाइल पुन्हा ओपन होण्याची शक्यता बळावलीय. विशेष म्हणजे भाजप आणि शिंदे गटानेही याच प्रकरणावर विरोधकांना घेरण्याची तयारी सुरू केल्याचे समजते.

नीतेश राणे यांनीही सुशांतसिंह प्रकरणाचा मुद्दा पुन्हा उपस्थित केलाय. या प्रकरणी आदित्य ठाकरे यांची नार्को टेस्ट करावी, अशी मागणी नीतेश यांनी केलीय. सुशातसिंह आत्महत्येची फाइल पुन्हा ओपन करण्यात यावी. या प्रकरणी 8 जून रोजी काय झाले? या प्रकरणाचा तपास अधिकारी दोनवेळा का बदलला? सीसीटीव्ही का गायब झाले? व्हिजिटर बुकचे त्या दोन दिवसांची पाने का फाडली? या प्रश्नांची उत्तरे समोर येण्याची गरज आहे. दिशा सालियानची केस मुंबई पोलिसांकडे आहे. आता मुख्यमंत्र्यांनी ती फाइल पुन्हा ओपन करावी. आदित्य ठाकरे यांची नार्को टेस्ट करावी आणि सत्य बाहेर येऊ द्यावे, अशी मागणी त्यांनी केलीय. दिशा सालियानच्या संशयास्पद मृत्यूचे प्रकरण विधानसभेत भरत गोगावले आणि नीतेश राणे यांनी उपस्थित केले. दिशा सालियान मृत्यू प्रकरणाची चौकशी करावी, अशी मागणी नीतेश राणे यांनी केली. दिशा सालियानचा पोस्टमॉर्टेम रिपोर्ट समोर न येणे हे प्रकरण गंभीर आहे. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी मुंबई पोलिसांनी करावी, अशी मागणी गोगावले आणि नीतेश राणे यांनी केली. दिशा सालियानाचा मृत्यू झाला त्या रात्री तिथे कोणता मंत्री उपस्थित होता, याची चौकशी करावी, अशी मागणी भाजप आणि शिंदे गटाच्या आमदारांनी विधानसभेत केली. याप्रकरणावरून विधानसभेचे कामकाज तहकूब करण्यात आले.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम