राज्यातील मंत्र्यांना मुख्यमंत्रीनी दिले सहपत्नीक भोजनाचे आमंत्रण !
बातमीदार| १६ ऑगस्ट २०२३ | राज्यातील शिंदे व फडणवीस यांच्या सत्तेत अजित पवार सहभागी झाल्यापासून शिंदे गटाला मोठी चिंता लागून होती, यातील अनेक नेत्यांनी उघडपणे बोलून देखील दाखविले होते तर गेल्या तीन दिवसापासून पुन्हा एकदा मुख्यमंत्री बदलाचे वारे सुरु असतांना आता थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्याच्या पत्नी लता शिंदे यांनी राज्य मंत्रिमंडळातील सर्व मंत्र्यांसाठी स्नेहभोजनाचे आयोजन केले आहे.
दि.१७ ऑगस्ट रोजी वांद्रे येथील ताज लॅन्डस् एन्ड या हॉटेलमध्ये संध्याकाळी 7 वाजता हे स्नेहभोजन पार पडणार आहे. अजित पवार गट मंत्रिमंडळात सहभागी झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी सर्व मंत्र्यांसाठी आयोजित केलेले हे पहिलेच स्नेहभोजन असणार आहे. यावेळी मुख्यमंत्री मंत्र्यांसोबत बैठकही घेणार असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे या स्नेहभोजनाकडे अवघ्या राज्याचे लक्ष असणार आहे. स्नेहभोजनाच्या निमित्ताने मंत्रिमंडळातील समन्वयासंदर्भात चर्चा होणार आहे. मंत्र्यांना यासंबधीच्या निमत्रंण पत्रिका देण्यात आल्या आहे. दरम्यान, अजित पवार गट सत्तेत सहभागी झाल्यापासून शिंदे गटातील सर्व आमदारांमध्ये प्रचंड असवस्था असल्याचे बोलले जात आहे. काही महत्त्वाची मंत्रीपदे व पालकमंत्रीपदासाठी इच्छूक असणाऱ्या शिंदे गटातील अनेकांच्या स्वप्नावर अजितदादा गटामुळे पाणी फेरले आहे. तसेच, नुकत्याच पुण्यात आलेल्या अमित शहांच्या दौऱ्यातही महाराष्ट्रात मुख्यमंत्री बदलण्याबाबत खलबते झाली, अशी माहिती आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे नाराज असल्याच्या चर्चाही सुरू झाल्या होत्या.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम