मुख्यमंत्री शिंदे या कारणासाठी जाणार कर्नाटक दौऱ्यावर !
दै. बातमीदार । २९ एप्रिल २०२३ । मागील काही दिवसांपासून कर्नाटकचं राजकारण तापलेलं आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल ‘विषारी साप’ असा उल्लेख केल्याने आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या होत्या. खर्गे यांनी नंतर यू टर्न घेत मी विचारसरणीबद्दल बोललो होतो, असा खुलासा केला. कर्नाटकमध्ये विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. कर्नाटकाच्या काही भागात मराठी मतं आहे. त्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कर्नाटकच्या दौऱ्यावर जाणार आहेत.
कर्नाटकमध्ये भाजप, काँग्रेस आणि जनता दल यांच्यामध्ये लढत होत आहे. त्या राज्यात सत्ताधारी पक्षाला संधी न देण्याचा प्रघात आहे. त्यामुळे यावेळी भाजपला धक्का बसणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात कर्नाटक दौऱ्यावर जाण्याची शक्यता आहे. कर्नाटकमध्ये असलेला मराठीबहुल भागात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रचार करणार आहेत. साधारण दोन ते तीन दिवस मुख्यमंत्री शिंदे कर्नाटकात प्रचार करतील, असं सांगितलं जात आहे. मराठी मतदारांना आकर्षित करण्यासाठी भाजपने फंडा आखला आहे. बेळगाव आणि परिसरातील भागातील मतं वळवण्यासाठी एकनाथ शिंदे प्रचारसभा आणि बैठका घेणार आहेत.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम