दै. बातमीदार । २५ डिसेंबर २०२२ । सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी सर्वच सज्ज झाले असून देशात ३१ डिसेंबरचे आयोजन देखील करण्यात येत आहे. पण राज्यातील थंडी कुठेही कमी होण्याचे नाव न घेता येणाऱ्या काही दिवसात जोरदार थंडी वाढणार असल्याचे संकेत आहेत. उत्तर व पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ आणि कोकणातील काही भागांत २४ ते ३१ डिसेंबरपर्यंत शीतलहर राहणार असून एक जानेवारीपासून राज्यात थंडीची लाट येणार असल्याचा अंदाज हवामानतज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी वर्तवला आहे.
शनिवारी राज्यातील किमान तापमान दोन ते तीन अंशांनी घसरले असून निफाडला नीचांकी ७.८ तापमानाची नोंद करण्यात आली. नाशकात पारा १०.३ अंशांवर होता. पाकिस्तानातून उत्तर भारतात येणाऱ्या पश्चिमी चक्रवातामुळे जम्मू-काश्मीर, लडाख, पंजाब, हिमाचल या भागात कडाक्याची थंडी असून तिकडून येणाऱ्या शीत वाऱ्यांमुळे गुजरात, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रात किमान तापमानात घसरण झाली आहे.
निवडक शहरांतील किमान तापमान {नाशिक १०.३ {निफाड ७.८ {धुळे ८.४ {उदगीर १५.२ {जालना १३.३ {महाबळेश्वर १५.५ { मुंबई १६.० { सांगली १५.२ {औरंगाबाद ११.६ {परभणी १४.६ {जळगाव १३.० {नांदेड १४.६ {उस्मानाबाद १४.२ {पुणे ११.६ {सातारा १४.०
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम